Skip to main content

जैनमुनींच्या हत्ये प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा दया :- विहिप बजरंग दल व वीर सेवा दल इचलकरंजीच्या वतीने निषेध व प्रांताधिकरीना निवेदन..

 जैनमुनींच्या हत्ये प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा दया :- विहिप बजरंग दल व वीर सेवा दल इचलकरंजीच्या वतीने निषेध व प्रांताधिकरीना निवेदन..


पुणे न्यूज एक्सप्रेस :

    इचलकरंजी :   हिंदू समाजाचा गाभा शक्ती स्थान असलेल्या साधू संत यांच्या वरील हल्ले म्हणजे समस्त हिंदू समाजावर हा घात आहे भविष्यात अश्या घटना घडू नये म्हणून तीव्र निषेध करत प्रांताधिकारी यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दल व वीर सेवा दल इचलकरंजी च्या वतीने निवेदन देण्यात आले..

अखंड हिंदुस्थान हा जगातील एकमेव देश आहे जो सहिष्णू सर्वसमावेक्षक व लोकशाही वर चालणारे राष्ट्र आहे याचे एकमेव कारण म्हणजे या भूमिस लाभलेली थोर संत महात्माची पार्श्वभूमी परंतु गेल्या काही दिवसांपासून अखंड हिंदुस्थान भर धर्मांध लोकांपासून आघात केले जात आहेत मग ते परधर्मीय असो किंवा स्वधर्मीय धर्माध हे अत्यंत निंदनीय व निषेधार्ध बाब आहे. जगाला अहिंसा व एकोपाचा संदेश देणारे चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी १०८ कामकुमार नंदी महाराज यांची निर्घून हत्या करण्यात आली जी हिंदू समाजावर मोठया प्रमाणात आघात करणारी बाब आहे.कर्नाटक सरकारने जे काही आताच्या काळात हिंदू विरोधी काही धोरणे जाहीर केलीत त्याचे हे प्रतिबिंब असून या अनुषंगाने हिंदुस्थानातील समस्त संत महंत यांच्या सुरक्षिकते चा प्रश्न ऐरणीवर आला आहे..

    


या निवेदनद्वारे हे विकृत कृत्य करणाऱ्या धर्मांध दोषींना कडक शासन करत फाशी ची शिक्षा देण्यात यावी जेणे करून भविष्यात कोणत्या धर्मांध व्यक्ती कडून असे कृत्य घडणार नाही व सोबतच हिंदुस्थानातील समस्त संत महंत यांच्या सुरक्षिकतेकडे हिंदुस्थान सरकारने गांभीर्य पूर्णपणे लक्ष्य घालावी अशी विनंती हिंदुस्थान सरकार कडे या निवेदनद्वारे करण्यात आली..सदर निवेदन प्रसंगी शिवप्रसाद व्यास, सोमेश्वर वाघमोडे, सुजित कांबळे ,बाळासाहेब ओझा, प्रवीण सामंत मुकुंद उरुणकर, मुकेश चोथे, मुकेश दायमा गणेश कांदेकर, राजू पाटील,आनंदा मुकोटे सर्जेराव कुंभार,अमोल शिरगुप्पे,प्रशांत पाटील,सुभाष पाटील,अथर्व केटकाळे,अभिजीत खोत,प्रज्वल उपाध्ये,राहुल सिदनाळे,शुभम कोथळे,प्रथमेश आलासे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

Comments