Skip to main content

Posts

Showing posts with the label कोल्हापूर

महावितरणकडून मिरवणूक मार्गावर दक्षता

 विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन पुणे न्यूज एक्सप्रेस :  विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :  कोल्हापूर परिमंडळ: महावितरणच्या यंत्रणेकडून गणेशोत्सव काळात ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा होण्यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. महावितरणकडून स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून मिरवणूक मार्गावर आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे.गणेशमुर्ती विसर्जनाची मिरवणुक निर्विघ्न पार पडण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, असे महावितरणचे आवाहन आहे.     गणेशमुर्ती विसर्जन मिरवणुकी दरम्यान विद्युत यंत्रणेतील विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर ), विद्युत खांबास ताण दिलेली तार, भूमिगत वाहिनींचे फिडर पिलर इ. पासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे. गणेश भक्तांनी व मंडळ कार्यकर्त्यांनी विद्युत खांब, रोहित्रे, फिडर पिलर इ.वर चढू नये. मिरवणुकीत लोखंडी/ धातूच्या रॉडच्या झेंड्यांचा, वाहनात किंवा वाहनाच्या टपावरील कार्यकर्त्यांचा विद्युत वाहिन्यांना स्पर्श होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. मिरवणुकीसाठी ...

समन्स ची प्रत देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलिसावर कारवाई

  लाच प्रकरणी अटक महिला पोलीस कॉन्स्टेबल काजल लोंढे पुणे न्यूज एक्सप्रेस :  मुरलीधर कांबळे :    कोल्हापूर- तक्रार अर्जाची निकाली काढ़लेल्या समन्स ची प्रत देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महिला कॉन्स्टेबल काजल गणेश लोंढ़े  ब.न.217  (वय 28 रा.बंगला नं.10 ,तिसरा मजला पार्वती कंन्सट्रकशन,सरनोबतवाडी ) असे लाच घेणाऱ्या महिलेचे नाव आहे. या पोलिस मुख्यालयात महिला सहाय्य कक्षात गेल्या आठ महिन्यांपासून कार्यरत आहेत त्याची 2014 ला जॉईनिंग आहे.अधिक माहिती अशी की,तक्रारदार यांनी  घरगुती कारणातुन पत्नीच्या विरोधात महिला सहाय्य कक्षाकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता तो अर्ज निकाली काढ़ण्यात आला .त्या निकाली काढ़लेल्या अर्जाची समन्सची प्रतची मागणी केली असता महिला कॉ.काजल लोंढ़े यांनी प्रत देणेसाठी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली असता तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलूचपत विभागाने पडताळणी करून सापळा रचून सदर काजल लोंढ़ेला दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून कारवाई केली. या कामी लाचलुचपत सांगली पोलिसांची ...