Skip to main content

Posts

Showing posts from July 11, 2023

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंदिरात स्क्रीन शटर नादुरुस्त असल्याने कार्यक्रम प्रदर्शिन होणे बंद....

  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंदिरात स्क्रीन शटर नादुरुस्त असल्याने कार्यक्रम प्रदर्शिन होणे बंद....  डॉ.तुषार  निकाळजे.  येरवडा, पुणे:- पुणे महानगरपालिकेचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  सांस्कृतिक रंगमंदिर, येरवडा, पुणे यामधील स्क्रीनशटर  नादुरुस्त झाल्याने सदर रंगमंचामुळे कलावंत, निर्माते, लघु चित्रपट वितरक यांची गैरसोय होत आहे. पुणे हे शैक्षणिक व सांस्कृतिक शहर असल्याने येथे वेगवेगळ्या कला, क्रीडा, नाटक, चित्रपट यांचे छोटे मोठे प्रयोग होत असतात.  छोट्या व्यावसायिकांना सदरचे रंगमंदिर आर्थिक दृष्ट्या परवडत असते. परंतु सध्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंग मंदिरातील ( येरवडा) स्क्रीनशटर नादुरुस्त असल्याने तेथील स्क्रीन वर लघु चित्रपट, माहितीपट दाखविता येत नाहीत. तसेच अशासकीय संस्था, शासकीय कार्यालय यांचे माहिती वजा प्रोजेक्टर देखील तेथे दाखविता येत नाहीत. त्यामुळे गैरसोय होत आहे. कोविड १९ च्या अनुषंगाने सर्वच व्यवस्था कोलमडल्या होत्या. त्याला नाट्य, चित्रपट विभाग अपवाद नाही. या विभागात काम करणारे छोटे-मोठे कलावंत यांची  रोजी-  रोटी यावर अवलंबून असते. यापूर्वी पुण्यातील बिबेवाडी येथील  नाट्यगृहातून

डॉ.पी.ए.इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार

डॉ.पी.ए.इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार   २० ऑगस्ट  रोजी पुण्यात राष्ट्रीय पुरस्कार वितरण. पुणे न्यूज एक्सप्रेस  पुणे : डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.शैक्षणिक,सामाजिक,सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.सन्मानचिन्ह,मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.   महाराष्ट्राच्या  सर्व जिल्ह्यातील,समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचाही सत्कार या देशपातळीवरील  कार्यक्रमात करण्यात येणार आहे.'प्रेस मीडिया लाईव्ह' संस्थेच्या वतीने हा पुरस्कार २० ऑगस्ट २०२३ रोजी , दुपारी १२ वाजता,आझम कॅम्पस येथे होणाऱ्या कार्यक्रमात देण्यात येणार आहे.'प्रेस मीडिया लाईव्ह' संस्थेचे प्रमुख  मेहबूब सर्जेखान यांनी पत्रकाद्वारे  ही माहिती दिली.