Skip to main content

Posts

Showing posts from July 13, 2023

समन्स ची प्रत देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलिसावर कारवाई

  लाच प्रकरणी अटक महिला पोलीस कॉन्स्टेबल काजल लोंढे पुणे न्यूज एक्सप्रेस :  मुरलीधर कांबळे :    कोल्हापूर- तक्रार अर्जाची निकाली काढ़लेल्या समन्स ची प्रत देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महिला कॉन्स्टेबल काजल गणेश लोंढ़े  ब.न.217  (वय 28 रा.बंगला नं.10 ,तिसरा मजला पार्वती कंन्सट्रकशन,सरनोबतवाडी ) असे लाच घेणाऱ्या महिलेचे नाव आहे. या पोलिस मुख्यालयात महिला सहाय्य कक्षात गेल्या आठ महिन्यांपासून कार्यरत आहेत त्याची 2014 ला जॉईनिंग आहे.अधिक माहिती अशी की,तक्रारदार यांनी  घरगुती कारणातुन पत्नीच्या विरोधात महिला सहाय्य कक्षाकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता तो अर्ज निकाली काढ़ण्यात आला .त्या निकाली काढ़लेल्या अर्जाची समन्सची प्रतची मागणी केली असता महिला कॉ.काजल लोंढ़े यांनी प्रत देणेसाठी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली असता तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलूचपत विभागाने पडताळणी करून सापळा रचून सदर काजल लोंढ़ेला दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून कारवाई केली. या कामी लाचलुचपत सांगली पोलिसांची मदत झाली.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक व

बेडकीहाळ येथे तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मान्यवरांची उपस्थिती

  बेडकीहाळ येथे तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मान्यवरांची उपस्थिती पुणे न्यूज एक्सप्रेस : बेडकीहाळ :-दूधगंगा नदीच्या काठावर वसलेले बेडकीहाळ हे गाव आर्थिकदृष्ट्या सधन म्हणून ओळखले जाते. दूधगंगा नदीचे बारमाही वाहणारे पाणी, सुपीक जमीन आणि उसासारख्या नगदी पिकाने हा परिसर सधन समजला जातो. तसेच सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि विशेष करून शैक्षणिक क्षेत्रात बेडकीहाळ अग्रेसर मानले जाते. बेडकीहाळ गावचे भौगोलिक स्थान पाहता बेळगाव, निपाणी, चिकोडी, कोल्हापूर, सांगली, हुपरी, इचलकरंजी अशा कर्नाटक महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना जोडणारे रस्ते आणि वाहतुकीची सोय यामुळे या परिसराचा झपाट्याने कायापालट होताना दिसतो आहे. या परिसरातील पहिले हायस्कूल 1952 साली बेडकीहाळ येथे स्थापन झाले आणि शैक्षणिक वटवृक्षाचे बीजारोपण झाले. हीच संस्था पुढे लठ्ठे शिक्षण संस्था या नावाने ओळखली जाऊ लागली आणि दळणवळणाच्या सोयीसाठी तिचे केंद्रीय कार्यालय सांगली येथे स्थापन करण्यात आले.  आज लठ्ठे शिक्षण संस्थेच्या शाखा बेडकीहाळ येथे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. लठ्ठे शिक्षण संस्थेमुळे बेडकीहाळचे नाव शैक्षणिक क्षेत्रात आदराने घेतले जा