Skip to main content

Posts

Showing posts from September 2, 2023

शांताराम बापूंना बाराव्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

  शांताराम बापूंना बाराव्या  स्मृतीदिनी विनम्र अभिवादन पुणे न्यूज एक्सप्रेस :  प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा आज रविवार ता. ३ सप्टेंबर २०२३ रोजी बारावा  स्मृतिदिन आहे. त्यांना कालवश होऊन एक तप झाले.१५ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले शांताराम बापू वृद्धापकाळाने शनिवार ता.३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात,विचारविश्वात ते तब्बल सात दशके कार्यरत होते. कमालीची साधी राहणी, वक्तशीरपणा, विचारातील स्पष्टता आणि बोलण्यातील मार्मिकता इत्यादी अंगभूत वैशिष्ट्यांसह बापू अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांनी थोर  विचारवंत नेते कालवश प्रा.डॉ.एन.डी.पाटील,शहीद गोविंद पानसरे यांच्यासह आपल्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद असलेल्या ‘ समाजवादी प्रबोधिनी ‘ची ११ मे १९७७ रोजी स्थापना केली. वयाच्या आठव्या वर्षीच स्वातंत्र्य आंदोलनातील वातावरणाने आणि वडील बंधूंच्या प्रेरणेतून