Skip to main content

Posts

Showing posts with the label कोल्हापूर जिल्हा

वक्रतुंड युवक मंडळ शाहूनगर जयसिंगपूर यांच्यावतीने अतिग्रे येथील महिलांचा सत्कार

  वक्रतुंड युवक मंडळ शाहूनगर जयसिंगपूर यांच्यावतीने अतिग्रे येथील महिलांचा सत्कार पुणे न्यूज एक्सप्रेस :  अतिग्रे प्रतिनिधी :  भरत शिंदे    वक्रतुंड युवक मंडळ शाहूनगर जयसिंगपूर या मंडळाचे गणेश विसर्जन वेळी अतिग्रे येथील नवदीप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या महिलांनी पारंपारिक पद्धतीने लेझीम कला सादर केली लेझीम पथकामध्ये  गणेशाचे विसर्जन मोठ्या आनंदाने उत्साहाने आपली कला महिलांनी सादर केली  शाहूनगर जयसिंगपूर या भागामध्ये सर्व नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात  कौतुक केले महिलांनी वक्रतुंड युवक मंडळामध्ये जी कला सादर केली यामध्ये त्यांना अध्यक्ष वाहतूक सेना श्री अण्णासो चव्हाण यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले अतिग्रे तालुका हातकणंगले नवदीप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातील महिलांनी विना मोबदला गणेश विसर्जनासाठी जयसिंगपूर येथे जाऊन आपली पारंपरिक लेझीम कला सादर केली मंडळामार्फत अतिग्रे ग्रामपंचायत विद्यमान सदस्या सौ दिपाली पाटील व माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला .   यावेळी मंडळाचे अध्यक्ष असद मुल्ला यांनी आमच्या म...

गोकुळाष्टमी निमित्त विठ्ठल रुक्मिणी ची मनोभावे पूजा करण्यात आली

पुणे न्यूज एक्सप्रेस :  विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले   रुकडी (तालुका हातकणंगले) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हॉल मध्ये गोकुळाष्टमी निमित्त  विठ्ठल रुक्मिणी ची मनोभावे पूजा केली. यावेळी दिवसभर भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले. त्यानिमित्त दिवसभर  टाळ मृदंगाच्या गजरात भजनचा   कार्यक्रम पार पाडला.  भागातील भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले.   यावेळी नामदेव लोखंडे, रघुनाथ लोखंडे, वसंत लोखंडे, महावीर लोखंडे, बाबासो लोखंडे, राजाराम साठे, दिलीप लोखंडे, विनायक आवळे,यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते .  सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. यावेळी  भारतीय दलित महासंघाचे राहुल घाटगे यांनी उपस्थिती दर्शवून सर्व भाविक भक्तांचे व संयोजकांचे   आभार मानले.