Skip to main content

Posts

Showing posts from September 26, 2023

महावितरणकडून मिरवणूक मार्गावर दक्षता

 विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन पुणे न्यूज एक्सप्रेस :  विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :  कोल्हापूर परिमंडळ: महावितरणच्या यंत्रणेकडून गणेशोत्सव काळात ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा होण्यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. महावितरणकडून स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून मिरवणूक मार्गावर आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे.गणेशमुर्ती विसर्जनाची मिरवणुक निर्विघ्न पार पडण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, असे महावितरणचे आवाहन आहे.     गणेशमुर्ती विसर्जन मिरवणुकी दरम्यान विद्युत यंत्रणेतील विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर ), विद्युत खांबास ताण दिलेली तार, भूमिगत वाहिनींचे फिडर पिलर इ. पासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे. गणेश भक्तांनी व मंडळ कार्यकर्त्यांनी विद्युत खांब, रोहित्रे, फिडर पिलर इ.वर चढू नये. मिरवणुकीत लोखंडी/ धातूच्या रॉडच्या झेंड्यांचा, वाहनात किंवा वाहनाच्या टपावरील कार्यकर्त्यांचा विद्युत वाहिन्यांना स्पर्श होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. मिरवणुकीसाठी विद्युत वाहिन्यांवर आकडे टाकु

रिक्षाचालकांनी निवारा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना घडवले दगडूशेठ हलवाई चे VIP दर्शन

  बघतोय रिक्षावाला पुणे तर्फे ज्येष्ठ नागरिकांना गणेश दर्शन उपक्रम    पुणे न्यूज एक्सप्रेस :     अन्वरअली शेख पुणे शहर दि.२५ टीम बघतोय रिक्षावाला तर्फे पुणे आज नवी पेठ येथील निवारा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत गणेश दर्शन घडवून आणण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. वृद्धाश्रमातील वृद्ध व निराधार नागरिकांना तीव्र इच्छा असून देखील गणपतीमध्ये गणेश दर्शनाला घेऊन जाण्यास कोणीही उपलब्ध नसते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वृद्धाश्रमातील *१०० आजी आजोबांना टीम बघतोय रिक्षावाला तर्फे पुण्यातील गणेशोत्सवातील " गर्दीतून वाट काढण्यास प्रसिद्ध "* असणाऱ्या *४० रिक्षाचालकांतर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे VIP दर्शन* उपलब्ध करून देण्यात आले.  वृद्धाश्रमात राहिला आल्यापासून पहिल्यांदाच गणपतीचे दर्शन घेत असल्याचे अनेक आजी आजोबांनी सांगितले. एक आजी बोलल्या आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की अश्याप्रकारे गणपतीत दगडु शेठ हलवाई चे दर्शन व आरती करायला मिळू शकेल. गणपती दर्शनाला जायचे म्हणून सकाळी लवकर उठून नवीन कपडे घालून, आवरून ज्येष्ठ नागरिक तयार होते. अनेकांनी गणपती बाप्पाच्या घोषण