Skip to main content

रिक्षाचालकांनी निवारा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना घडवले दगडूशेठ हलवाई चे VIP दर्शन

 बघतोय रिक्षावाला पुणे तर्फे ज्येष्ठ नागरिकांना गणेश दर्शन उपक्रम 


 पुणे न्यूज एक्सप्रेस : 

   अन्वरअली शेख

पुणे शहर दि.२५ टीम बघतोय रिक्षावाला तर्फे पुणे आज नवी पेठ येथील निवारा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत गणेश दर्शन घडवून आणण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. वृद्धाश्रमातील वृद्ध व निराधार नागरिकांना तीव्र इच्छा असून देखील गणपतीमध्ये गणेश दर्शनाला घेऊन जाण्यास कोणीही उपलब्ध नसते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वृद्धाश्रमातील *१०० आजी आजोबांना टीम बघतोय रिक्षावाला तर्फे पुण्यातील गणेशोत्सवातील " गर्दीतून वाट काढण्यास प्रसिद्ध "* असणाऱ्या *४० रिक्षाचालकांतर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे VIP दर्शन* उपलब्ध करून देण्यात आले. 

वृद्धाश्रमात राहिला आल्यापासून पहिल्यांदाच गणपतीचे दर्शन घेत असल्याचे अनेक आजी आजोबांनी सांगितले. एक आजी बोलल्या आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की अश्याप्रकारे गणपतीत दगडु शेठ हलवाई चे दर्शन व आरती करायला मिळू शकेल. गणपती दर्शनाला जायचे म्हणून सकाळी लवकर उठून नवीन कपडे घालून, आवरून ज्येष्ठ नागरिक तयार होते. अनेकांनी गणपती बाप्पाच्या घोषणा दिल्या व काहींनी ठेका धरला. 


आजी आजोबांचा आनंद बघून रिक्षाचालकांना केलेल्या कष्टचे चीज झाल्याचा व स्वतच्या आजी आजोबांना गणपती दर्शनाला नेल्याचा आनंद मिळाला. डॉ. केशव नाना क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून सदर उपक्रम राबवण्यात आला होता. व तो यशस्वी व्हावा म्हणून फय्याज मोमीन , कमलेश गवळी , गोपाळ बांदल, जयश्री अब्राहम , सोनी शेंडगे व इतर रिक्षाचालकांनी मेहनत घेतली.

Comments

Popular Posts

शांताराम बापूंना बाराव्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

  शांताराम बापूंना बाराव्या  स्मृतीदिनी विनम्र अभिवादन पुणे न्यूज एक्सप्रेस :  प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा आज रविवार ता. ३ सप्टेंबर २०२३ रोजी बारावा  स्मृतिदिन आहे. त्यांना कालवश होऊन एक तप झाले.१५ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले शांताराम बापू वृद्धापकाळाने शनिवार ता.३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात,विचारविश्वात ते तब्बल सात दशके कार्यरत होते. कमालीची साधी राहणी, वक्तशीरपणा, विचारातील स्पष्टता आणि बोलण्यातील मार्मिकता इत्यादी अंगभूत वैशिष्ट्यांसह बापू अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांनी थोर  विचारवंत नेते कालवश प्रा.डॉ.एन.डी.पाटील,शहीद गोविंद पानसरे यांच्यासह आपल्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद असलेल्या ‘ समाजवादी प्रबोधिनी ‘ची ११ मे १९७७ रोजी स्थापना केली. वयाच्या आठव्या वर्षीच स्वातंत्र्य आंदोलनातील वातावरणाने आणि व...