Skip to main content

Posts

Showing posts from September 18, 2023

नारायण देवी चॅरिटेबल संस्थेच्या वतीने शिक्षक गौरव समारंभ संपन्न

 गुणवंत शिक्षक व कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित  पुणे न्यूज एक्सप्रेस :  अन्वरअली शेख  देहूरोड शहर दि.19 शहरातील प्रख्यातसंस्था नारायण देवी चारिटेबल ट्रस्ट व ईश्वर अग्रवाल यांनी शिक्षक दिनानिमित्त अवचित साधून आदर्श शाळा व गुणवंत शिक्षक व कर्मचारी पुरस्कार समारंभ आयोजित केले होते, या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि मोठ्या संख्येने जन समुदाय उपस्थित होते, यावेळी संस्थेचे संस्थापक ईश्वर अगरवाल म्हणाले नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेल्या 38 वर्षापासून मानव हिताचे विविध उपक्रम  यशस्वीरित्या राबवित आहे, आणि या सर्व उपक्रमात माझे सहकारी विशेष दीपक चौगुले आणि इतर सर्व सहकारी माझ्या सोबत आहेत, संस्थेने करोना काळात विविध प्रकारच्या सेवा गरजू लोकांपर्यंत पोहोचविल्या  त्यावेळी प्रत्येक जण आपला जीव जपत होते अशा संकट काळात नारायण देवी ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी व सहकारी रस्त्यावर उतरून भुकेलेल्या लोकांना अन्न वाटप करून गोरगरिबांची सेवा केली तसेच करोना मधे  मृत पावलेल्या 22 मृतदेहाचे अंत्यविधी संस्कार संस्थेने  केले.  मानवतेच्या उद्देशातून शिक्ष

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांची घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांची घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट पुणे न्यूज एक्सप्रेस :      इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी आज सोमवार दि.१८सप्टेंबर रोजी शहरातील सांगली रोड नजीकच्या कचरा डेपो आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासह संपूर्ण परिसराची  पाहणी केली.       वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार, स्वच्छता निरीक्षक संजय भोईटे आणि कंपनीचे प्रतिनिधी यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, लिचड ट्रीटमेंट केंद्र आणि बायोमिथेनेशन केंद्रा बाबतची सविस्तर माहिती दिली.   स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे  सर्व प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याने सर्वच प्रकल्प पुर्ण क्षमतेने आणि गुणवत्तापुर्वक रित्या सुरू ठेवण्याच्या सूचना आयुक्त यांनी आरोग्य अधिकारी यांना दिल्या. तसेच त्याठिकाणी अद्यापही कार्यान्वित न झालेले लिचड ट्रीटमेंट केंद्र तातडीने सुरू करणेचे आदेश संबंधित कंपनी च्या प्रतिनिधींना दिले.    यावेळी शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता संजय बागडे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे यांचेसह कंपनीचे प्रतिनिधी उ