Skip to main content

Posts

Showing posts from July 17, 2023

तळागळातील लोकांसाठी निस्वार्थपणे झटणारे आलताफभाई आहेत - जय पाटील

तळागळातील लोकांसाठी निस्वार्थपणे झटणारे आलताफभाई आहेत - जय पाटील पुणे न्यूज एक्सप्रेस : बारामती: मुस्लीम समाजातील तळागळातील लोकांसाठी निस्वार्थपणे झटणारे आलताफभाई सय्यद असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती शहर अध्यक्ष जय पाटील यांनी व्यक्त केले.मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे उन्नती मुदत कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या वतीने आलताफ सय्यद यांचा आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी श्री.पाटील बोलत होते.  यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर युवकाध्यक्ष अविनाश बांदल, मुस्लिम समाजातील ज्येष्ठ हाजी शब्बीर कुरेशी, मा.उपनगराध्यक्षा सौ.तरन्नुम सय्यद, मा.नगरसेवक सुरज सातव, कुंदन लालबिगे, संतोष जगताप, कसबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जमीर इनामदार, हाजी युसूफ इनामदार, सादिक मोमीन, निसार शेख, जाकीर तांबोळी, हाजी रशिद बागवान, कारी साहब, मुक्ती सरवत, तैनुर शेख इ. मान्यवर उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले की, समाजसेवा म्हणजे दबलेल्या, पिचलेल्यांना हात देणे त्यांना उभे करणे हे काम आलताफभाईंनी केले व करीत आहेत. रईस चित्रपटाचे उदाहरण देत ते म्हणाले, शाहरूख खान आपल्या जवळच्या लोकांची वेगळे

अवधुत आखाडा व्यायाम मंडळ "चे नूतनीकरण नंतर अत्याधुनिक नवीन पध्दतीने सुसज्ज असलेल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन सोहळा संपन्न

पुणे न्यूज एक्सप्रेस :  मुसा खलिफा :  इचलकरंजी :  वस्ञपंढरीतील नामांकित म्हणून प्रसिद्ध असलेल्या अवधुत आखाडा परिसरातील "शतक महोत्सवी अवधुत आखाडा व्यायाम मंडळ "चे नूतनीकरण नंतर अत्याधुनिक नवीन पध्दतीने सुसज्ज असलेल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन आज सोमवार दिनांक 17 जुलै,23 रोजी सायंकाळी  व्यायाम मंडळाच्या प्रांगणात शिवसेनेचे (शिंदे गट) चे लोकप्रिय व अतुलनीय विकासाभिमुख कार्यसम्राट जिल्हाध्यक्ष श्री रविंद्र जी माने साहेब, महाराष्ट्र केसरी श्री अमृतमामा भोसले साहेब, माजी नगरसेवक श्री भाऊसो आवळे साहेब  यांच्या अमृत हस्ते फीत कापून शानदार उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इचलकरंजीत ज्येष्ठ व श्रेष्ठ पितृतूल्य उत्तुंग व्यक्तीमत्व असलेले वंदनीय श्रीमान रेहमान चाचा खलिफा होते.  या सोहळ्यास मंडळाचे क्रियाशील अध्यक्ष श्री रमेश जी दादा शिरगुरे साहेब, उपाध्यक्ष श्री रविंद्र जी माने साहेब, विद्यमान व सर्वानाच सोबत घेऊन कार्यरत राहणारे नम्रशील सेक्रेटरी श्री आझम जी तथा मुसाभाई खलिफा साहेब, कार्यतत्पर खजिनदार श्री गजानन रावजी शिरगुरे साहेब, कर्तव्यदक्ष सर्वश्री विद्यमान संचालक श्र