Skip to main content

तळागळातील लोकांसाठी निस्वार्थपणे झटणारे आलताफभाई आहेत - जय पाटील


तळागळातील लोकांसाठी निस्वार्थपणे झटणारे आलताफभाई आहेत - जय पाटील


पुणे न्यूज एक्सप्रेस :

बारामती: मुस्लीम समाजातील तळागळातील लोकांसाठी निस्वार्थपणे झटणारे आलताफभाई सय्यद असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती शहर अध्यक्ष जय पाटील यांनी व्यक्त केले.मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे उन्नती मुदत कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या वतीने आलताफ सय्यद यांचा आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी श्री.पाटील बोलत होते. 



यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर युवकाध्यक्ष अविनाश बांदल, मुस्लिम समाजातील ज्येष्ठ हाजी शब्बीर कुरेशी, मा.उपनगराध्यक्षा सौ.तरन्नुम सय्यद, मा.नगरसेवक सुरज सातव, कुंदन लालबिगे, संतोष जगताप, कसबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जमीर इनामदार, हाजी युसूफ इनामदार, सादिक मोमीन, निसार शेख, जाकीर तांबोळी, हाजी रशिद बागवान, कारी साहब, मुक्ती सरवत, तैनुर शेख इ. मान्यवर उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले की, समाजसेवा म्हणजे दबलेल्या, पिचलेल्यांना हात देणे त्यांना उभे करणे हे काम आलताफभाईंनी केले व करीत आहेत. रईस चित्रपटाचे उदाहरण देत ते म्हणाले, शाहरूख खान आपल्या जवळच्या लोकांची वेगळे अस्तित्व बनवितो त्याच पद्धतीने समाजासाठी एक जागा घेऊन त्याठिकाणी घरकुल योजना राबविण्याचा त्यांचा मनोदय असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देत येणार्‍या काळात त्यांना योग्य ती मदत केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.



.

याप्रसंगी तैनुर शेख, हाजी शब्बीर कुरेशी, अविनाश बांदल, तानाजी पाथरकर इ. मनोगत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना आलताफ सय्यद म्हणाले की, आतापर्यंत सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामांपैकी हे काम खूप किचकट होते. महाराष्ट्र शासनाकडून शहरात 2 कोटी रूपये आणणे ही सोपी गोष्ट नव्हती. राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्याने त्यांचे स्वीव सहाय्यक राम चोबे व हनुमंत पाटील यांच्या मदतीने व महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लालमियॉं शेख यांच्या सहकार्याने हे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले. लाभार्थ्यांनी वेळोवेळी कर्जाचे हप्ते भरून महामंडळास सहकार्य केल्यास तुमची पत महामंडळात निर्माण करावी असेही त्यांनी शेवटी सांगितले. मुस्लिम समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना एकत्रित करून भूखंड खरेदी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले व त्या भूखंडावर घरे बांधण्यासाठी साहेब, दादा व ताईंच्या माध्यमातून घरकुल योजना राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments