Skip to main content

Posts

Showing posts from August 31, 2023

जयंत महापात्रा :घट्ट भारतीयत्व व वैश्विक भान असलेला थोरकवी

पुणे न्यूज एक्सप्रेस :  प्रसाद माधव कुलकर्णी ,इचलकरंजी  (९८ ५०८ ३० २९०) prasad.kulkarni65@gmail.com मानवी जीवनाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाच्या भारतीय कवींमध्ये जयंत महापात्रा यांची गणना आवर्जून करावी लागते. ओडिशात राहणारे आणि इंग्रजीतून लिहिणारे  जयंत महापात्रा वयाच्या ९५ व्या वर्षी २७ ऑगस्ट २०२३ रोजी कालवश झाले. २२ ऑक्टोबर १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला होता.कटक येथेच त्यांचा जन्म व मृत्यू झाला. १९४९ ते १९८६ या काळात त्यांनी भौतिकशास्त्राचे अध्यापक म्हणून काम केले.जयंत महापात्रानी वयाच्या चाळीशीत कवितेचा हात धरला. आणि पुढची अर्धशतकाहून अधिक काळ कवितेसोबत समृद्ध वाटचाल केली. उडिया भाषेतील सात, इंग्रजी भाषेतील वीस असे तब्बल २७ काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. त्यांनी ललित लेखनही केले होते.लघु कथा लिहिल्या. उडिया भाषेतील साहित्याचा इंग्रजी अनुवादही केला होता.'चंद्रभागा ' या सकस साहित्य चर्चा करणाऱ्या नियतकालिकाचे ते संपादकही होते.जयंत महापात्रांना सार्क साहित्य पुरस्काराबरोबर देशविदेशातील अनेक महत्त्वाचे पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले होते.२००९ साली त्य