Skip to main content

Posts

Showing posts from July 12, 2023

मेहबुब पानसरे यांच्या खून प्रकरणातील एकास गुन्हे शाखेने पकडले.

पुणे न्यूज एक्सप्रेस :. पुणे :   जेजुरी  येथील माजी नगरसेवक  मेहबुब पानसरे यांच्या खून प्रकरणातील एकास गुन्हे शाखेने पकडले . युनिट सहाच्या पथकाने त्याला वाघोली परिसरातून सापळा रचुन त्याला पकडण्यात यश आले ,  दत्ता मारूती मळेकर (वय ४५, रा. 883, गुरूवार पेठ, महाराणा प्रताप रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस हवालदार मच्छिंद्र वाळके, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

टोमॅटो दरवाढीच्या अनुषंगाने उपाययोजनांचा कृषि आयुक्तांनी घेतला आढावा

उपलब्धतेबाबत अहवाल सादर करण्याचे अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांना दिले निर्देश पुणे न्यूज एक्सप्रेस : पुणे  : सध्या बाजारात वाढलेले टोमॅटोचे दर व त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. चालू खरीप हंगामातील टोमॅटो पिकाखालील क्षेत्र व उत्पादनाबाबत माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी यावेळी दिले. राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण ५६ ते ५७ हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४० ते ४२ हजार हेक्टर क्षेत्र तर रब्बी व उन्हाळी हंगामात सर्वसाधारण १६ ते १७ हजार हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली जाते. यापासून सर्वसाधारणपणे १० लाख मे. टन उत्पादन अपेक्षित असते. डिसेंबर २०२२ ते मे २०२३ दरम्यान टोमॅटोला अतिशय अल्प दर मिळाल्याने या पिकाच्या नवीन लागवडीवर त्याचा परिणाम झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तसेच मार्च पासून मे महिन्यापर्यंत अवेळी पाऊस, गारपीट यामुळे टोमॅटो आणि इतर भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसून येते. यावर्षी पाऊस उशिरा आला असून सरासरीच्या ५४ टक

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा अट रद्द करा

  या मागणी करिता पॅंथर आर्मीचे आझाद मैदान मुंबई येथे 20 जुलै रोजी आंदोलन पुणे न्यूज एक्सप्रेस :  मुंबई प्रतिनिधी : अनुसूचित जाती व नव बौद्ध भूमीहीन शेतमजुरांना सबल करणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा बागायती करिता आठ लाख रुपये व जिरायती करिता पाच लाख रुपये ही अट रद्द करून बाजारभावानुसार शेतजमिनी खरेदी करून द्याव्यात या मागणी करिता पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने मुंबई आझाद मैदान येथे 20  जुलै रोजी आंदोलन करणार असल्याचे निवेदन राष्ट्रीय कार्यकारी प्रमुख संतोष आठवले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांना दिले आहे. महाराष्ट्र राज्यातील भूमीहिंना च्या सबलीकरणाचा एक भाग म्हणून राज्य शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना सुरू केली पण यंत्रणेतील असंवेदनशीलतेमुळे व जाचक अटी मुळे भूमिहीन शेतमजूर शेतमालक बनणारी योजना म्हणावी इतकी प्रभावी ठरू शकली नाही .सामाजिक न्याय विभागाला प्रत्येक वर्षी हजारो कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करून सुद्धा भूमीहिंनाच्या योजनेसाठी शूल्लक तरतूद केली जाते. आण

जैनमुनींच्या हत्ये प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा दया :- विहिप बजरंग दल व वीर सेवा दल इचलकरंजीच्या वतीने निषेध व प्रांताधिकरीना निवेदन..

  जैनमुनींच्या हत्ये प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा दया :- विहिप बजरंग दल व वीर सेवा दल इचलकरंजीच्या वतीने निषेध व प्रांताधिकरीना निवेदन.. पुणे न्यूज एक्सप्रेस :     इचलकरंजी :   हिंदू समाजाचा गाभा शक्ती स्थान असलेल्या साधू संत यांच्या वरील हल्ले म्हणजे समस्त हिंदू समाजावर हा घात आहे भविष्यात अश्या घटना घडू नये म्हणून तीव्र निषेध करत प्रांताधिकारी यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दल व वीर सेवा दल इचलकरंजी च्या वतीने निवेदन देण्यात आले.. अखंड हिंदुस्थान हा जगातील एकमेव देश आहे जो सहिष्णू सर्वसमावेक्षक व लोकशाही वर चालणारे राष्ट्र आहे याचे एकमेव कारण म्हणजे या भूमिस लाभलेली थोर संत महात्माची पार्श्वभूमी परंतु गेल्या काही दिवसांपासून अखंड हिंदुस्थान भर धर्मांध लोकांपासून आघात केले जात आहेत मग ते परधर्मीय असो किंवा स्वधर्मीय धर्माध हे अत्यंत निंदनीय व निषेधार्ध बाब आहे. जगाला अहिंसा व एकोपाचा संदेश देणारे चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी १०८ कामकुमार नंदी महाराज यांची निर्घून हत्या करण्यात आली जी हिंदू समाजावर मोठया प्रमाणात आघात करणारी बाब आहे.कर्नाटक सरकारने जे

शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतूकीत बदल

 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतूकीत बदल पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे. :  पुरंदर तालुक्यातील जेजुरी  येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत. वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून १३ जुलै रोजी पहाटे ५  वाजेपासून ते सायं. ८ वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.  जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक: सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड अवजड व इतर - वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलाप

अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे, खते खरेदी करावीत- कृषि आयुक्त सुनील चव्हाण

  अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे, खते खरेदी करावीत- कृषि आयुक्त सुनील चव्हाण पुणे न्यूज एक्सप्रेस : पुणे : चालू खरीप हंगामातील पेरणीच्या अनुषंगाने राज्यात १६ लाख ८२ हजार २४५ क्विंटल म्हणजे ८७ टक्के बियाण्याचा पुरवठा झाला असून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावीत, असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. राज्याचे सरासरी पर्जन्यमान ३१४.३ मिमी असून आत्तापर्यंत २२७.३ मिमी एवढा पाऊस झाला आहे. खरीप हंगामासाठी ४६.७ मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. चालू खरीप हंगामातील पेरणीचे क्षेत्र १४२ हेक्टर आहे. आजअखेर ४७.१३ लाख हेक्टरवर ३३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सद्यस्थितीत कापूस, सोयाबीन व तूर या पिकांच्या पेरण्या तसेच प्रामुख्याने भात रोपवाटिकेची कामे सुरु आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडल्यास या आठवड्यात पेरणीच्या कामाला वेग येईल.  राज्यात पुरेसे बियाणे उपलब्ध असून फसवणूक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरेदीची पावती व टॅग जपून ठेवावेत. कृषिविषयक योजनांच्या माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी १८००२३३४००० या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहनही कृषि व