Skip to main content

मेहबुब पानसरे यांच्या खून प्रकरणातील एकास गुन्हे शाखेने पकडले.



पुणे न्यूज एक्सप्रेस :.

पुणे :  जेजुरी  येथील माजी नगरसेवक  मेहबुब पानसरे यांच्या खून प्रकरणातील एकास गुन्हे शाखेने पकडले . युनिट सहाच्या पथकाने त्याला वाघोली परिसरातून सापळा रचुन त्याला पकडण्यात यश आले ,  दत्ता मारूती मळेकर (वय ४५, रा. 883, गुरूवार पेठ, महाराणा प्रताप रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.


पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस हवालदार मच्छिंद्र वाळके, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

Comments