Skip to main content

Posts

Showing posts from August 16, 2023

इचलकरंजीतील पंचगंगा नदीत झालेल्या होड्यांच्या शर्यतीत कवठेसारच्या हजरत सय्यद बादशहा बोट क्लबनं प्रथम क्रमांक पटकावला.

पुणे न्यूज एक्सप्रेस :   इचलकरंजी, प्रतिनिधी - क्रिकेट, फुटबॉल यासह अनेक विदेशी खेळ पाहणारे शौकीन वाढत आहेत. मात्र आता देशी खेळांना व्यापक स्वरुप आणणं, देशी खेळ खेळणार्‍या खेळाडुंना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्यामुळं होड्यांच्या शर्यतीला प्रोत्साहन म्हणून श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्या वतीनं होणार्‍या दरवर्षीच्या होड्यांच्या शर्यतीसाठी 51 हजाराचं बक्षिस देण्याचं खासदार धनंजय महाडीक यांनी जाहीर केलं. दरम्यान भक्त मंडळाच्यावतीनं इचलकरंजीतील पंचगंगा नदीत झालेल्या होड्यांच्या शर्यतीत कवठेसारच्या हजरत सय्यद बादशहा बोट क्लबनं प्रथम क्रमांक पटकावला.            श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्यावतीनं होड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमीत्तानं आलेल्या खासदार महाडीक यांनी वरदविनायक मंदिरात श्रींची आरती केली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाचे संस्थापक मल्लय्य स्वामी यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून होड्यांच्या शर्यती व्हायच्या पण कोरोना महामारीमुळं खंडीत झालेल्या