Skip to main content

Posts

Showing posts with the label इचलकरंजी

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांची घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांची घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट पुणे न्यूज एक्सप्रेस :      इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी आज सोमवार दि.१८सप्टेंबर रोजी शहरातील सांगली रोड नजीकच्या कचरा डेपो आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासह संपूर्ण परिसराची  पाहणी केली.       वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार, स्वच्छता निरीक्षक संजय भोईटे आणि कंपनीचे प्रतिनिधी यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, लिचड ट्रीटमेंट केंद्र आणि बायोमिथेनेशन केंद्रा बाबतची सविस्तर माहिती दिली.   स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे  सर्व प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याने सर्वच प्रकल्प पुर्ण क्षमतेने आणि गुणवत्तापुर्वक रित्या सुरू ठेवण्याच्या सूचना आयुक्त यांनी आरोग्य अधिकारी यांना दिल्या. तसेच त्याठिकाणी अद्यापही कार्यान्वित न झालेले लिचड ट्रीटमेंट केंद्र तातडीने सुरू करणेचे आदेश संबंधित कंपनी च्या प्रतिनिधींना दिले.    यावेळी शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता संजय बागडे, माहिती व ज...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र मंडळाचे उदघाटन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र मंडळाचे उदघाटन  पुणे न्यूज एक्सप्रेस :        इचलकरंजी दि.९ : येथील श्रीमती आं.रा.पाटील कन्या महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने "अर्थतज्ञ  डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र मंडळ' व   माजी विद्यार्थिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या अर्थशास्त्र मंडळाच्या उदघाटन प्रसंगी अर्थशास्त्राचे जनक अँडम स्मिथ यांच्या जीवनकार्यावरील भित्तीपत्रिकेचे उदघाटन समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलाताना त्यांनी अँडम स्मिथ यांचे अर्थशास्त्रातील योगदान किती महत्वपूर्ण आहे याविषयी माहिती दिली. अर्थशास्त्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे भारतीय अर्थ व्यवस्थेतील एक महत्वाचा पैलू असल्याने अर्थशास्त्र मंडळाचे नामकरण अर्थतज्ञ  डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र मंडळ असे केल्याचे प्राचार्या प्रो.डॉ. त्रिशला कदम यांनी स्पष्ट  केले. यावेळी या मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.अर्थशास्त्र  विभागातील कु. प्रियांका सागर हिची  अध्यक्ष तर ऋतुजा हरसुरे हि...

बुधवारी इचलकरंजी बंदला समस्त मुस्लिम समाज कडून पाठिंबा जाहीर

  बुधवारी इचलकरंजी बंदला समस्त मुस्लिम समाज कडून  पाठिंबा जाहीर  पुणे न्यूज एक्सप्रेस : युसुफ तासगावे :  इचलकरंजी : जालना मराठा आरक्षणावर झालेल्या लाठीमार निषेध म्हणून बुधवारी इचलकरंजी बंदची हाक दिली असून या  बंदला समसत मुस्लिम समाज कडून  पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. आजच्या झालेल्या बैठकीत कैस बागवान अहमद मुजावर यांनी अयुबभाई गजबरवाडी युसुफ तासगांवे इमतीया मैशाळे सादिक जमादार फरीद मुजावर इम्रान हावेरी अल्ताफ शेख मौलाना जावेद समीर शेख अबु पानार इम्रान मकानदार ,   मेहबूब मुजावर तोफीक हिपरगी , मुस्लिम समाजाचे इचलकरंजी कोर कमिटीचे प्रमुख उपस्थिती होती

अतिग्रे येथे सराटी येथे झालेल्या आंदोलकावर लाठीमार झाला त्यासाठी अतिग्रे गावातून निषेध करण्यात आला

  अतिग्रे येथे सराटी येथे झालेल्या आंदोलकावर लाठीमार झाला त्यासाठी अतिग्रे गावातून निषेध करण्यात आला पुणे न्यूज एक्सप्रेस :   भरत शिंदे : अतिग्रे प्रतिनिधी    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या आंदोलकावर शुक्रवारी आंतरवाली सराटी या गावात पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे अतिग्रे तालुका हातकणले येथे जय जवान जय किसान सेवाभावी संस्था व अतिग्रे गावातील लहान थोर युवक हनुमान मंदिर व ग्रामपंचायत चौक येथे एकत्र येऊन त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.   यावेळी बोलताना संदीप बिडकर यांनी सांगितले महाराष्ट्राचा झेंडा फडकवणारा हा मराठा समाज आज आरक्षणासाठी नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी धडपडतोय मराठा समाजाने गेले कित्येक वर्षांमध्ये 58 आंदोलने लाखोंच्या उपस्थितीमध्ये काढली गेली जी 58 आंदोलने काढण्यात आली त्यामध्ये साधा दगड ही कधी पडला नाही 58 आंदोलनामधून ॲम्बुलन्सला वाट द्यावी लागली तर तीही देण्यात आली आहे एवढे शांततेने आतापर्यंत लाखोंच्या उपस्थितीत आंदोलन केले आहेत आमची मागणी मराठा समाजाची मागणी शासनाने सरकारने अद्याप प...

शांताराम बापूंना बाराव्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

  शांताराम बापूंना बाराव्या  स्मृतीदिनी विनम्र अभिवादन पुणे न्यूज एक्सप्रेस :  प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा आज रविवार ता. ३ सप्टेंबर २०२३ रोजी बारावा  स्मृतिदिन आहे. त्यांना कालवश होऊन एक तप झाले.१५ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले शांताराम बापू वृद्धापकाळाने शनिवार ता.३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात,विचारविश्वात ते तब्बल सात दशके कार्यरत होते. कमालीची साधी राहणी, वक्तशीरपणा, विचारातील स्पष्टता आणि बोलण्यातील मार्मिकता इत्यादी अंगभूत वैशिष्ट्यांसह बापू अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांनी थोर  विचारवंत नेते कालवश प्रा.डॉ.एन.डी.पाटील,शहीद गोविंद पानसरे यांच्यासह आपल्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद असलेल्या ‘ समाजवादी प्रबोधिनी ‘ची ११ मे १९७७ रोजी स्थापना केली. वयाच्या आठव्या वर्षीच स्वातंत्र्य आंदोलनातील वातावरणाने आणि व...

जयंत महापात्रा :घट्ट भारतीयत्व व वैश्विक भान असलेला थोरकवी

पुणे न्यूज एक्सप्रेस :  प्रसाद माधव कुलकर्णी ,इचलकरंजी  (९८ ५०८ ३० २९०) prasad.kulkarni65@gmail.com मानवी जीवनाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाच्या भारतीय कवींमध्ये जयंत महापात्रा यांची गणना आवर्जून करावी लागते. ओडिशात राहणारे आणि इंग्रजीतून लिहिणारे  जयंत महापात्रा वयाच्या ९५ व्या वर्षी २७ ऑगस्ट २०२३ रोजी कालवश झाले. २२ ऑक्टोबर १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला होता.कटक येथेच त्यांचा जन्म व मृत्यू झाला. १९४९ ते १९८६ या काळात त्यांनी भौतिकशास्त्राचे अध्यापक म्हणून काम केले.जयंत महापात्रानी वयाच्या चाळीशीत कवितेचा हात धरला. आणि पुढची अर्धशतकाहून अधिक काळ कवितेसोबत समृद्ध वाटचाल केली. उडिया भाषेतील सात, इंग्रजी भाषेतील वीस असे तब्बल २७ काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. त्यांनी ललित लेखनही केले होते.लघु कथा लिहिल्या. उडिया भाषेतील साहित्याचा इंग्रजी अनुवादही केला होता.'चंद्रभागा ' या सकस साहित्य चर्चा करणाऱ्या नियतकालिकाचे ते संपादकही होते.जयंत महापात्रांना सार्क साहित्य पुरस्काराबरोबर देशविदेशातील अनेक महत्त्वाचे पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले होते.२००९ सा...

इचलकरंजीतील पंचगंगा नदीत झालेल्या होड्यांच्या शर्यतीत कवठेसारच्या हजरत सय्यद बादशहा बोट क्लबनं प्रथम क्रमांक पटकावला.

पुणे न्यूज एक्सप्रेस :   इचलकरंजी, प्रतिनिधी - क्रिकेट, फुटबॉल यासह अनेक विदेशी खेळ पाहणारे शौकीन वाढत आहेत. मात्र आता देशी खेळांना व्यापक स्वरुप आणणं, देशी खेळ खेळणार्‍या खेळाडुंना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्यामुळं होड्यांच्या शर्यतीला प्रोत्साहन म्हणून श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्या वतीनं होणार्‍या दरवर्षीच्या होड्यांच्या शर्यतीसाठी 51 हजाराचं बक्षिस देण्याचं खासदार धनंजय महाडीक यांनी जाहीर केलं. दरम्यान भक्त मंडळाच्यावतीनं इचलकरंजीतील पंचगंगा नदीत झालेल्या होड्यांच्या शर्यतीत कवठेसारच्या हजरत सय्यद बादशहा बोट क्लबनं प्रथम क्रमांक पटकावला.            श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्यावतीनं होड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमीत्तानं आलेल्या खासदार महाडीक यांनी वरदविनायक मंदिरात श्रींची आरती केली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाचे संस्थापक मल्लय्य स्वामी यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून होड्यांच्या शर्यती व्हायच्य...

अवधुत आखाडा व्यायाम मंडळ "चे नूतनीकरण नंतर अत्याधुनिक नवीन पध्दतीने सुसज्ज असलेल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन सोहळा संपन्न

पुणे न्यूज एक्सप्रेस :  मुसा खलिफा :  इचलकरंजी :  वस्ञपंढरीतील नामांकित म्हणून प्रसिद्ध असलेल्या अवधुत आखाडा परिसरातील "शतक महोत्सवी अवधुत आखाडा व्यायाम मंडळ "चे नूतनीकरण नंतर अत्याधुनिक नवीन पध्दतीने सुसज्ज असलेल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन आज सोमवार दिनांक 17 जुलै,23 रोजी सायंकाळी  व्यायाम मंडळाच्या प्रांगणात शिवसेनेचे (शिंदे गट) चे लोकप्रिय व अतुलनीय विकासाभिमुख कार्यसम्राट जिल्हाध्यक्ष श्री रविंद्र जी माने साहेब, महाराष्ट्र केसरी श्री अमृतमामा भोसले साहेब, माजी नगरसेवक श्री भाऊसो आवळे साहेब  यांच्या अमृत हस्ते फीत कापून शानदार उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इचलकरंजीत ज्येष्ठ व श्रेष्ठ पितृतूल्य उत्तुंग व्यक्तीमत्व असलेले वंदनीय श्रीमान रेहमान चाचा खलिफा होते.  या सोहळ्यास मंडळाचे क्रियाशील अध्यक्ष श्री रमेश जी दादा शिरगुरे साहेब, उपाध्यक्ष श्री रविंद्र जी माने साहेब, विद्यमान व सर्वानाच सोबत घेऊन कार्यरत राहणारे नम्रशील सेक्रेटरी श्री आझम जी तथा मुसाभाई खलिफा साहेब, कार्यतत्पर खजिनदार श्री गजानन रावजी शिरगुरे साहेब, कर्तव्यदक्ष सर्वश्री ...

जैनमुनींच्या हत्ये प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा दया :- विहिप बजरंग दल व वीर सेवा दल इचलकरंजीच्या वतीने निषेध व प्रांताधिकरीना निवेदन..

  जैनमुनींच्या हत्ये प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा दया :- विहिप बजरंग दल व वीर सेवा दल इचलकरंजीच्या वतीने निषेध व प्रांताधिकरीना निवेदन.. पुणे न्यूज एक्सप्रेस :     इचलकरंजी :   हिंदू समाजाचा गाभा शक्ती स्थान असलेल्या साधू संत यांच्या वरील हल्ले म्हणजे समस्त हिंदू समाजावर हा घात आहे भविष्यात अश्या घटना घडू नये म्हणून तीव्र निषेध करत प्रांताधिकारी यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दल व वीर सेवा दल इचलकरंजी च्या वतीने निवेदन देण्यात आले.. अखंड हिंदुस्थान हा जगातील एकमेव देश आहे जो सहिष्णू सर्वसमावेक्षक व लोकशाही वर चालणारे राष्ट्र आहे याचे एकमेव कारण म्हणजे या भूमिस लाभलेली थोर संत महात्माची पार्श्वभूमी परंतु गेल्या काही दिवसांपासून अखंड हिंदुस्थान भर धर्मांध लोकांपासून आघात केले जात आहेत मग ते परधर्मीय असो किंवा स्वधर्मीय धर्माध हे अत्यंत निंदनीय व निषेधार्ध बाब आहे. जगाला अहिंसा व एकोपाचा संदेश देणारे चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी १०८ कामकुमार नंदी महाराज यांची निर्घून हत्या करण्यात आली जी हिंदू समाजावर मोठया प्रमाणात आघात करणारी बा...