Skip to main content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र मंडळाचे उदघाटन


डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र मंडळाचे उदघाटन 


पुणे न्यूज एक्सप्रेस : 

      इचलकरंजी दि.९ : येथील श्रीमती आं.रा.पाटील कन्या महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने "अर्थतज्ञ  डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र मंडळ' व   माजी विद्यार्थिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या अर्थशास्त्र मंडळाच्या उदघाटन प्रसंगी अर्थशास्त्राचे जनक अँडम स्मिथ यांच्या जीवनकार्यावरील भित्तीपत्रिकेचे उदघाटन समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी याच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी बोलाताना त्यांनी अँडम स्मिथ यांचे अर्थशास्त्रातील योगदान किती महत्वपूर्ण आहे याविषयी माहिती दिली. अर्थशास्त्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे भारतीय अर्थ व्यवस्थेतील एक महत्वाचा पैलू असल्याने अर्थशास्त्र मंडळाचे नामकरण अर्थतज्ञ  डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र मंडळ असे केल्याचे प्राचार्या प्रो.डॉ. त्रिशला कदम यांनी स्पष्ट  केले. यावेळी या मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.अर्थशास्त्र  विभागातील कु. प्रियांका सागर हिची  अध्यक्ष तर ऋतुजा हरसुरे हिची खजानीस म्हणून निवड करण्यात आली. कु.सानिया फकीर ,कु. श्रेया कोकणे, कु.कोमल राठी ,इत्यादी विधार्थीनिनी भित्तीपत्रिका बनवण्यात उत्स्पुर्त सहभाग घेतला .स्वागत व प्रास्ताविक डॉ.संपदा टिकपुर्ले यांनी केले. आभार प्रा.स्वप्नील वाकडे यांनी मानले. सूत्रसंचालन कु. ऋतुजा हरसुरे हिने केले.यावेळी अभिजित पटवा, सुहास पाटील,महेंद्र जाधव आदी उपस्थित होते,

Comments