Skip to main content

Posts

Showing posts from July 14, 2023

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पहाणी

  चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पहाणी उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने करण्याच्या  सूचना पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे  : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामास भेट देऊन  पाहणी केली.  उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने पूर्ण करावे आणि उद्घाटन कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दीपक पोटे, अमोल बालवडकर, माजी नगरसेविका अल्पना वर्पे, आदी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुला प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १२ ऑगस्ट रोजी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्यादृष्टीने श्री. पाटील यांनी चांदणी चौक येथे भेट दिली. पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय रा

प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन

  प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक शेवट पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे जिल्ह्य़ातील मावळ येथील एका सोसायटीतील एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळला.   निधन समयी त्यांचे वय ७७ होते . 80 च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीतील हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रविंद्र महाजनी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले.  या एव्हरग्रीन अभिनेत्याच्या करिअरची सुरुवात टॅक्सी चालवण्यापासून झाली होती.  रविंद्र महाजनी हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. अभिनय क्षेत्रात पाय ठेवण्यापूर्वी ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत. त्यांनी साधारणपणे 3 वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली. मात्र, त्यांच्यातील एक कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ते दिवसा वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत. रविंद्र महाजनी यांनी मराठीसह हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्येही काम केले. रविंद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ यां