Skip to main content

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पहाणी

 चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पहाणी

उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने करण्याच्या  सूचना


पुणे न्यूज एक्सप्रेस : 

पुणे  : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामास भेट देऊन  पाहणी केली.  उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने पूर्ण करावे आणि उद्घाटन कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दीपक पोटे, अमोल बालवडकर, माजी नगरसेविका अल्पना वर्पे, आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुला प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १२ ऑगस्ट रोजी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्यादृष्टीने श्री. पाटील यांनी चांदणी चौक येथे भेट दिली.

पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकात उड्डाणपूल, सेवा रस्ता उभारण्यात येत असून, सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रकल्प संचालक संजय कदम यांनी यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांना दिली.

पुणेकरांसाठी चांदणी चौक हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे त्याचे उर्वरित काम जलदगतीने पूर्ण करावे. त्यासोबतच कामात कोणतीही त्रुटी राहू नये, याची खबरदारी घ्यावी. पावसाची शक्यता लक्षात घेऊन, उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.



Comments

Popular Posts

शांताराम बापूंना बाराव्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

  शांताराम बापूंना बाराव्या  स्मृतीदिनी विनम्र अभिवादन पुणे न्यूज एक्सप्रेस :  प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा आज रविवार ता. ३ सप्टेंबर २०२३ रोजी बारावा  स्मृतिदिन आहे. त्यांना कालवश होऊन एक तप झाले.१५ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले शांताराम बापू वृद्धापकाळाने शनिवार ता.३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात,विचारविश्वात ते तब्बल सात दशके कार्यरत होते. कमालीची साधी राहणी, वक्तशीरपणा, विचारातील स्पष्टता आणि बोलण्यातील मार्मिकता इत्यादी अंगभूत वैशिष्ट्यांसह बापू अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांनी थोर  विचारवंत नेते कालवश प्रा.डॉ.एन.डी.पाटील,शहीद गोविंद पानसरे यांच्यासह आपल्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद असलेल्या ‘ समाजवादी प्रबोधिनी ‘ची ११ मे १९७७ रोजी स्थापना केली. वयाच्या आठव्या वर्षीच स्वातंत्र्य आंदोलनातील वातावरणाने आणि व...

उपनिबंधकांनी कर्नल विनायक केळकर आणि राजिब बासू वर घातली बंदीः

  उंड्रीतील न्याती सह. गृहनिर्माण सोसायटीतील प्रकरण.  पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे :  पुण्यातील मार्केट यार्ड येथील श्री दिगंबर हौसारे - उपनिबंधकांनी उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीमधील विनायक केळकर आणि राजीव बसू यांच्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत व तसे  अंमलबजावणी  साठीचे पत्र   सोसायटीच्या  चेअरमन  आणि सेक्रेटरीना पाठविण्यात  आले आहे.  उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे केळकर आणि  बासू  सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य असून, मुख्य कन्व्हेयन्स डीड प्रकरणांमध्ये लुडबूड करीत आहेत. कन्व्हेयन्स डीड प्रक्रियेमध्ये एफएसआय आणि टीडीआरचा वाटाघाटींचा समावेश असून,त्याचे मूल्य ५० कोटींनच्या पेक्षाही जास्त आहे. त्यातील मुख्य सूत्रधार केळकर न्याती बिल्डर्ससमवेत पूर्वी नोकरी केल्यामुळे जोडलेला आहे व आजही सोसायटीमधील सगळी माहिती तो बिल्डरला वेळोवेळी पुरवीत असतो व बिल्डरच्या  इशाऱ्याप्रमाणे  इथले कामकाज चालवीत असतो.विशेष म्हणजे केळकरच...