Skip to main content

प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन

 प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक शेवट



पुणे न्यूज एक्सप्रेस : 

पुणे जिल्ह्य़ातील मावळ येथील एका सोसायटीतील एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळला.   निधन समयी त्यांचे वय ७७ होते . 80 च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीतील हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रविंद्र महाजनी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले.  या एव्हरग्रीन अभिनेत्याच्या करिअरची सुरुवात टॅक्सी चालवण्यापासून झाली होती. 

रविंद्र महाजनी हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. अभिनय क्षेत्रात पाय ठेवण्यापूर्वी ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत. त्यांनी साधारणपणे 3 वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली. मात्र, त्यांच्यातील एक कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ते दिवसा वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत. रविंद्र महाजनी यांनी मराठीसह हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्येही काम केले. रविंद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ यांसारख्या चित्रपटातून भूमिका केल्या..'बेअब्रु' या हिंदी चित्रपटात भूमिका केली. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली .



Comments

Popular Posts

सय्यद मुख्तार अली को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड

  सय्यद मुख्तार अली को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड पुणे ( मोहम्मद जावेद मौला)  :  एंग्लो उर्दू बॉईज परिवार की जानिब से एंग्लो उर्दू हाई स्कूल के रिटायर्ड स्पोर्ट टीचर सय्यद मुख्तार अली हादी को पिछले दिनों बुध 19 सितंबर  2023  को सुबाह 11 बजे गोल्डन ज्युबिली कॉफ्रन्स हॉल में प्रोग्राम के सदर शाहिद इनामदार ( प्रेसिडेंट गोल्डन ज्युबिली इज्युकेशन ट्रस्ट)  के हाथों लाईफ टाईम अचीवमेंट अवार्ड से नवाजा गया. एस. ए. इनामदार (वाइस चेरमन मुस्लिम बैंक और चेरमन एंग्लो उर्दू बॉईज हाई स्कूल) महेमाने खुसूसी थे. इस मौके पर राज मुजावर ( प्रिंसिपल एग्लो उर्दू हाई स्कूल), जाहेदा शाहिद इनामदार( प्रिंसिपल हाजी गुलाम मोहम्मद आज़म उर्दू प्रायमरी स्कूल) वहीद बियाबानी, अजय कुलकर्णी, इबराहीम शेख  अल्ताफ शेख, प्रोग्राम के कन्वीनर लाइक अली मुजावर, गुलाम अली काजी और कसीर तादाद में एंग्लो उर्दू के स्टूडेंट्स, स्टेट और नेशनल खिलाड़ी मौजूद थे. प्रोग्राम का आगाज़ मौलाना सादिक के तिलावते कुरआन पाक से हुवा इस के बाद सय्यद मुख्तार अली हादी को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड से नवाजते हुए सदारती खुतबे...

शांताराम बापूंना बाराव्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

  शांताराम बापूंना बाराव्या  स्मृतीदिनी विनम्र अभिवादन पुणे न्यूज एक्सप्रेस :  प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा आज रविवार ता. ३ सप्टेंबर २०२३ रोजी बारावा  स्मृतिदिन आहे. त्यांना कालवश होऊन एक तप झाले.१५ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले शांताराम बापू वृद्धापकाळाने शनिवार ता.३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात,विचारविश्वात ते तब्बल सात दशके कार्यरत होते. कमालीची साधी राहणी, वक्तशीरपणा, विचारातील स्पष्टता आणि बोलण्यातील मार्मिकता इत्यादी अंगभूत वैशिष्ट्यांसह बापू अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांनी थोर  विचारवंत नेते कालवश प्रा.डॉ.एन.डी.पाटील,शहीद गोविंद पानसरे यांच्यासह आपल्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद असलेल्या ‘ समाजवादी प्रबोधिनी ‘ची ११ मे १९७७ रोजी स्थापना केली. वयाच्या आठव्या वर्षीच स्वातंत्र्य आंदोलनातील वातावरणाने आणि व...