Skip to main content

अतिग्रे येथे सराटी येथे झालेल्या आंदोलकावर लाठीमार झाला त्यासाठी अतिग्रे गावातून निषेध करण्यात आला

 अतिग्रे येथे सराटी येथे झालेल्या आंदोलकावर लाठीमार झाला त्यासाठी अतिग्रे गावातून निषेध करण्यात आला



पुणे न्यूज एक्सप्रेस : 

 भरत शिंदे : अतिग्रे प्रतिनिधी

   मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या आंदोलकावर शुक्रवारी आंतरवाली सराटी या गावात पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे अतिग्रे तालुका हातकणले येथे जय जवान जय किसान सेवाभावी संस्था व अतिग्रे गावातील लहान थोर युवक हनुमान मंदिर व ग्रामपंचायत चौक येथे एकत्र येऊन त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. 


 यावेळी बोलताना संदीप बिडकर यांनी सांगितले महाराष्ट्राचा झेंडा फडकवणारा हा मराठा समाज आज आरक्षणासाठी नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी धडपडतोय मराठा समाजाने गेले कित्येक वर्षांमध्ये 58 आंदोलने लाखोंच्या उपस्थितीमध्ये काढली गेली जी 58 आंदोलने काढण्यात आली त्यामध्ये साधा दगड ही कधी पडला नाही 58 आंदोलनामधून ॲम्बुलन्सला वाट द्यावी लागली तर तीही देण्यात आली आहे एवढे शांततेने आतापर्यंत लाखोंच्या उपस्थितीत आंदोलन केले आहेत आमची मागणी मराठा समाजाची मागणी शासनाने सरकारने अद्याप पर्यंत मान्य केलेले नाही आरक्षण म्हणतोय म्हणजे आमचे हक्काचे आरक्षण आहे मराठा समाजातील मुलांना नोकरीमध्ये शिक्षणामध्ये हा समाज आर्थिक दृष्ट्या मागास झालेला समाज आहे याला कुठेतरी स्थान मिळावे व सराटी येथे झालेल्या घटनेचा मी निषेध व्यक्त करत आहे 

     यावेळी उपस्थित आजी-माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष जयसिंग मुसळे ताना तानाजी पाटील संदीप बिडकर मारुती कुंभार विजय पाटील श्रीकांत बिडकर माजी सरपंच तानाजी पाटील अर्जुन कुंभार बजरंग माळी विठ्ठल पाटील अशोक गोंधळी कृष्णाथ गुरव संग्राम जाधव शीलवंत बिडकर व इतर गावातील नागरिक उपस्थित होते

   

Comments