Skip to main content

शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतूकीत बदल

 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतूकीत बदल


पुणे न्यूज एक्सप्रेस : 

पुणे. :  पुरंदर तालुक्यातील जेजुरी  येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.

वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून १३ जुलै रोजी पहाटे ५  वाजेपासून ते सायं. ८ वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. 

जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक: सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड अवजड व इतर - वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापुर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत. पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर- कोथळे- नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे. 

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक: बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती मोरगाव- सुपा- केडगाव चौफुला मार्गे पुणे- सोलापूर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.  

सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हवीतील वाहतूक: पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण - सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा - फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे- वीर- वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे. 

वाहतुकीस लावलेले निर्बंध  १३  जुलै रोजीच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


Comments

Popular Posts

उपनिबंधकांनी कर्नल विनायक केळकर आणि राजिब बासू वर घातली बंदीः

  उंड्रीतील न्याती सह. गृहनिर्माण सोसायटीतील प्रकरण.  पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे :  पुण्यातील मार्केट यार्ड येथील श्री दिगंबर हौसारे - उपनिबंधकांनी उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीमधील विनायक केळकर आणि राजीव बसू यांच्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत व तसे  अंमलबजावणी  साठीचे पत्र   सोसायटीच्या  चेअरमन  आणि सेक्रेटरीना पाठविण्यात  आले आहे.  उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे केळकर आणि  बासू  सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य असून, मुख्य कन्व्हेयन्स डीड प्रकरणांमध्ये लुडबूड करीत आहेत. कन्व्हेयन्स डीड प्रक्रियेमध्ये एफएसआय आणि टीडीआरचा वाटाघाटींचा समावेश असून,त्याचे मूल्य ५० कोटींनच्या पेक्षाही जास्त आहे. त्यातील मुख्य सूत्रधार केळकर न्याती बिल्डर्ससमवेत पूर्वी नोकरी केल्यामुळे जोडलेला आहे व आजही सोसायटीमधील सगळी माहिती तो बिल्डरला वेळोवेळी पुरवीत असतो व बिल्डरच्या  इशाऱ्याप्रमाणे  इथले कामकाज चालवीत असतो.विशेष म्हणजे केळकरचे पॅनल  निवडणुकीमध्ये हरलेले आहे म्हणजेच सभासदानी त्यांना नाकारलेले आहे आणि शेख