Skip to main content

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा अट रद्द करा

  या मागणी करिता पॅंथर आर्मीचे आझाद मैदान मुंबई येथे 20 जुलै रोजी आंदोलन


पुणे न्यूज एक्सप्रेस : 

मुंबई प्रतिनिधी : अनुसूचित जाती व नव बौद्ध भूमीहीन शेतमजुरांना सबल करणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा बागायती करिता आठ लाख रुपये व जिरायती करिता पाच लाख रुपये ही अट रद्द करून बाजारभावानुसार शेतजमिनी खरेदी करून द्याव्यात या मागणी करिता पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने मुंबई आझाद मैदान येथे 20  जुलै रोजी आंदोलन करणार असल्याचे निवेदन राष्ट्रीय कार्यकारी प्रमुख संतोष आठवले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांना दिले आहे.

महाराष्ट्र राज्यातील भूमीहिंना च्या सबलीकरणाचा एक भाग म्हणून राज्य शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना सुरू केली पण यंत्रणेतील असंवेदनशीलतेमुळे व जाचक अटी मुळे भूमिहीन शेतमजूर शेतमालक बनणारी योजना म्हणावी इतकी प्रभावी ठरू शकली नाही .सामाजिक न्याय विभागाला प्रत्येक वर्षी हजारो कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करून सुद्धा भूमीहिंनाच्या योजनेसाठी शूल्लक तरतूद केली जाते. आणि ती सुद्धा प्रतिवर्षी खर्च होत नाही याचे मुख्य कारण म्हणजे अत्यंत जाचक अटी . एका बाजूने शासन सवलतीची खैरात करते व दुसऱ्या बाजूने राज्यातील अनुसूचित जाती भूमिहीन शेतमजूर सक्षम होऊ नये याचे कुटील कारस्थान करते


आंदोलनातील  मागण्या....

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील दारिद्र्यरेषेची अट रद्द करावी .

या योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा बागायती करिता आठ लाख रुपये व जिरायती करिता पाच लाख रुपये ही अट रद्द करून भूमीहिंन शेतमजुरांना बाजारभावानुसार शेतजमिनी खरेदी करून द्याव्यात. 

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेसाठी राज्यातील महसूल पडीक जमीन इनाम जमीन सैनिकी जमीन 32 ग प्रकार जमीन राज्य शासनाने खरेदी करून लँड बँक तयार करावी व पात्र भूमीहिनांना  देण्यात यावी. 

पूर्वीच्या काळी राजे राजवाडे यांनी दलित, अनुसूचित जाती समाजाच्या गटसमूहाला शेत जमिनी दिल्या होत्या उदाहरणात माहरकी, महार वतन ,हडकी परंतु त्यांचे सध्या वंश वाढल्याने व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या जमिनीचे रूपांतर एक ते पाच गुंठेच्या मालकीचे झाले आहे या जमिनीवर त्या कुटुंबाचे उदरनिर्वाह होत नाही. तसेच त्या जमिनीत कसता येत नाहीत त्यामुळे एक ते पाच गुंठ्याच्या जमीन मालकांना इतरांच्या शेतावर शेतमजूर करून आपले दरिद्री जीवन जगावे लागत आहे .अशा एक ते पाच गुंठ्याच्या भूधारकांना भूमीहीन म्हणून घोषित करावे व योजनेचा लाभ द्यावा 

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेसाठी आई-वडील पती-पत्नी यांच्या नावे 25 वर्षांपूर्वी शेतजमीन नसल्याच्या दाखल्याची अट रद्द करावी 

भूमिहीन शेतमजूर दाखला तहसीलदाराने कोणत्या निकषाने द्यावा याचा आदेश अध्यापही तलाठी व तहसीलदार यांना शासनाने दिलेले नाहीत तर भूमिहीन ठरवण्याचा निकष शासनाने त्वरित जाहीर करावा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेसाठी शासनाने लाभार्थ्यांना भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला त्याच गावातील शेतकऱ्याकडून घेण्याची अट रद्द करावी 

या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रधान क्रमाचे अट रद्द करून जिल्ह्यात कुठेही जमीन खरेदी करून देण्याची मुभा देण्यात यावी 

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील पूर्वी लाभ घेतलेल्या भूमीहीन शेतमजुरांना त्यांच्या जमिनीचे कर्ज माफ करावे 

प्रतिवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेसाठी शासनाने प्रतिवर्षी 500 कोटी रुपयांची तरतूद करावी

 वरील मागण्यांच्या बाबतीत शासनाने गांभीर्याने विचार करून राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध भूमीहिंन शेतमजुरांना न्याय द्यावा या मागण्यांकरीता आझाद मैदान येथे बेमूद अमरण उपोषण आंदोलन होणार आहे या आंदोलनात भुमिहीन शेतमजूरांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Comments