Skip to main content

बेडकीहाळ येथे तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मान्यवरांची उपस्थिती

 बेडकीहाळ येथे तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मान्यवरांची उपस्थिती


पुणे न्यूज एक्सप्रेस :

बेडकीहाळ :-दूधगंगा नदीच्या काठावर वसलेले बेडकीहाळ हे गाव आर्थिकदृष्ट्या सधन म्हणून ओळखले जाते. दूधगंगा नदीचे बारमाही वाहणारे पाणी, सुपीक जमीन आणि उसासारख्या नगदी पिकाने हा परिसर सधन समजला जातो. तसेच सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि विशेष करून शैक्षणिक क्षेत्रात बेडकीहाळ अग्रेसर मानले जाते.

बेडकीहाळ गावचे भौगोलिक स्थान पाहता बेळगाव, निपाणी, चिकोडी, कोल्हापूर, सांगली, हुपरी, इचलकरंजी अशा कर्नाटक महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना जोडणारे रस्ते आणि वाहतुकीची सोय यामुळे या परिसराचा झपाट्याने कायापालट होताना दिसतो आहे. या परिसरातील पहिले हायस्कूल 1952 साली बेडकीहाळ येथे स्थापन झाले आणि शैक्षणिक वटवृक्षाचे बीजारोपण झाले. हीच संस्था पुढे लठ्ठे शिक्षण संस्था या नावाने ओळखली जाऊ लागली आणि दळणवळणाच्या सोयीसाठी तिचे केंद्रीय कार्यालय सांगली येथे स्थापन करण्यात आले. 

आज लठ्ठे शिक्षण संस्थेच्या शाखा बेडकीहाळ येथे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. लठ्ठे शिक्षण संस्थेमुळे बेडकीहाळचे नाव शैक्षणिक क्षेत्रात आदराने घेतले जाऊ लागले. ग्रामीण भागातील विद्यार्थी उत्कृष्ट पद्धतीने घडवण्याचे कार्य ही संस्था आणि तिच्या शाखा करू लागल्या. अशा आर्थिकदृष्ट्या सधन आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असलेल्या बेडकीहाळ परिसरातील साहित्यप्रेमी मंडळींना साहित्याची मेजवानी उपलब्ध करून देणारी संस्था म्हणजे कै. बसवंत नागू शिंगाडे चारिटेबल ट्रस्ट ही होय.

सामुदायिक विवाह सोहळा, गरजूंना अर्थसहाय्य, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप यासारखे सामाजिक कार्य हाती घेतलेल्या या ट्रस्टकडून बेडकीहाळ येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येऊ लागले आणि यंदाचे हे संमेलनाचे तिसरे वर्ष आहे. येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या बी एस संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाच्या रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहामध्ये दिनांक 16 जुलै 2023 रविवार रोजी होणाऱ्या या तिसऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी सहभाग घेणार आहेत. बेळगाव येथील लिंगराज महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापिका आणि माजी मराठी विभाग प्रमुख, ज्येष्ठ निरूपणकार श्रीमती विजया धोपेश्वरकर या संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत तर कन्नडमधील ज्येष्ठ साहित्यिक, माजी संपादक, बेळगावी जिल्हा कन्नड साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ सरजू काटकर हे संमेलनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. बेडकीहाळ गावच्या सरपंच सौ सविता पाटील या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष आहेत.उद्घाटन, व्याख्यान आणि कथाकथन अशा तीन सत्रांमध्ये चालणाऱ्या या साहित्य संमेलनास विधानपरिषद सदस्य मा प्रकाश हुक्केरी, चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा अण्णासाहेब जोले, निपाणी विधानसभा मतदार संघाच्या आमदार मा सौ शशिकला जोल्ले, चिकोडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा गणेश हुक्केरी, माजी आमदार मा काकासाहेब पाटील माजी ऊर्जामंत्री मा वीरकुमार पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी मतदार संघाचे युवा नेते उत्तम अण्णा पाटील, बी एस संयुक्त पदवी पूर्व महाविद्यालयाचे चेअरमन मा इंद्रजीत पाटील, सरस्वती को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक श्री जनगोडा पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सकाळी आठ वाजता सर्कल परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योजिका मा डॉ सुमित्रा पाटील आणि उद्योजक दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते ग्रंथ आणि पालखी पूजन होणार आहे. तर कृषीपंडित मा सुरेश देसाई यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तर गुरुदत्त शुगर टाकळीवाडीचे संचालक मा बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब कुलकर्णी बेडकीहाळकर प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तर स्व सुलोचना लाटकर दीदी साहित्य नगरीचे उद्घाटन कंदलगाव येथील व्ही. जे. पाटील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा वसंतराव पाटील करणार आहेत. तर माजी जिल्हा पंचायत सदस्य मा राजेंद्र वड्डर (पवार) यांच्या हस्ते स्व जी ए कुलकर्णी व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

मा आर जी डोमणे, मा मलगोडा पाटील, मा सुनील नारे, प्रा. डॉ गोपाल महामुनी, मा उदय पांगिरे, मा शितल खोत, मा अशोक झेंडे, मा सखाराम जाधव, मा प्रसिद्ध निलायज्योती, मा भारत माळगे आदी मान्यवरांच्या हस्ते विविध महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये मा श्री प्रकाश कदम, कोगनोळी यांचे आजचे शिक्षण आणि संस्कार' या विषयावर मा प्रकाश काशीद यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान होणार आहे. तर तिसऱ्या सत्रामध्ये इचलकरंजी येथील प्रसिद्ध कथाकथनकार मा कृष्णात कोरवी यांचे कथाकथन होणार असून या सत्राचे अध्यक्ष मा डॉ बाळासाहेब कर्णवर पाटील हे असणार आहेत, अशी माहिती

ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष या. डॉ विक्रम बसवंत शिंगाडे यांनी दिली तसेच साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

Comments

Popular Posts

जामा मस्जिद ट्रस्ट देहूरोड का ईद-मिलाद कार्यक्रम धूमधाम से मनाया गया

  जामा मस्जिद ट्रस्ट कमेटी द्वारा सभी बच्चों को उपहार( इनाम ) वितरित किये गये पुणे न्यूज  एक्सप्रेस : अन्वरअली शेख :   देहुर रोड : स्थित जामा मस्जिद ट्रस्टी कमिटी की ओर से हर साल मस्जिद परिसर में ईद-ए-मिलाद के मौके पर कार्यक्रम आयोजित किया जाता है. हर साल की तरह इस साल भी ईद-ए-मिलाद के मौके पर मस्जिद में आयोजित  जलसे मे मकतब मदरसे के बच्चों ने तकरिर भाषण एवं प्रतियोगिता कार्यक्रम मे भाग लीया। मोहम्मद पैगंबर सहाब के जीवनी पर आधारित विभिन्न क्षेत्रों पर व्याख्यान दिये।  इसमें शहर के विभिन्न मस्जिद के कमिटी के पदाधिकारियों को आमंत्रित किया गया था, मकतब मदरसे में पढ़ने वाले बच्चों के अभिभावक बड़ी संख्या में मौजूद थे.  जामा मस्जिद ट्रस्टी की जानिब से मकतब मदरसे मे पढने वाले सभी बच्चो को इनाम दिया गया, देहूरोड शहर के मान्यवर व्यक्तियों हाजी अ. रज्जाक शेख, पापा खान शीतला नगर, गफूर भाई शेख मुस्लिम विचारक एंव अध्यक्ष मावल तालुका कांग्रेस अल्पसंख्यक, हाजी अ. रशीद शिकिलकर, समीर शेख वरिष्ठ पत्रकार, फारूक शेख, बादशा भाई तंबोली, हाफिज अनवरअली शेख अध्यक्ष ऑल इंडिया उ...

चांदतारा चौक मे इदे मीलादुन्नबी (स) पर वडापाव और जिलेबी तकसीम

  चांदतारा चौक मे इदे मीलादुन्नबी (स) पर वडापाव और जिलेबी तकसीम पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे  (मोहम्मद जावेद मौला )  :  ईदेमिलादुन्नबी ( स) जुलूस के मौके पर इतवार । अक्तोबार  2023  को चाँद तारा चौक में पोलीस मित्र (खडक पोलीस स्टेशन) की जानिब से जुलूस में आए आशिकाने रसुल (स) का सत्कार मेहमाने खुसूसी सचिन माळी (पोलीस शिपाई, खडक पोलीस स्टेशन) के हाथों वडापान और जीलेबी दे कर किया गया.  इस मौक पर पोलीस मित्र के तनवीर शेख, गुलजार शेख, सलमान शेख, बॉबी शेख, अनीस दलाल, ख्वाजा शरीफ, जावेद शेख 90, शकील शेख, साजिद मोमिन ,फिरोज शेख शामिल थे. इस से पहले पोलीस शिपाई सचिन माली का सत्कार चांदताराचौक के पूर्व अध्यक्ष जाफर शेख ने किया. इस मौके पर चांदताराचोक के पूर्व पदाधिकारी शोएब शेख  वगैरह मौजूद थे.

वक्रतुंड युवक मंडळ शाहूनगर जयसिंगपूर यांच्यावतीने अतिग्रे येथील महिलांचा सत्कार

  वक्रतुंड युवक मंडळ शाहूनगर जयसिंगपूर यांच्यावतीने अतिग्रे येथील महिलांचा सत्कार पुणे न्यूज एक्सप्रेस :  अतिग्रे प्रतिनिधी :  भरत शिंदे    वक्रतुंड युवक मंडळ शाहूनगर जयसिंगपूर या मंडळाचे गणेश विसर्जन वेळी अतिग्रे येथील नवदीप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या महिलांनी पारंपारिक पद्धतीने लेझीम कला सादर केली लेझीम पथकामध्ये  गणेशाचे विसर्जन मोठ्या आनंदाने उत्साहाने आपली कला महिलांनी सादर केली  शाहूनगर जयसिंगपूर या भागामध्ये सर्व नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात  कौतुक केले महिलांनी वक्रतुंड युवक मंडळामध्ये जी कला सादर केली यामध्ये त्यांना अध्यक्ष वाहतूक सेना श्री अण्णासो चव्हाण यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले अतिग्रे तालुका हातकणंगले नवदीप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातील महिलांनी विना मोबदला गणेश विसर्जनासाठी जयसिंगपूर येथे जाऊन आपली पारंपरिक लेझीम कला सादर केली मंडळामार्फत अतिग्रे ग्रामपंचायत विद्यमान सदस्या सौ दिपाली पाटील व माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला .   यावेळी मंडळाचे अध्यक्ष असद मुल्ला यांनी आमच्या म...

मेहबुब पानसरे यांच्या खून प्रकरणातील एकास गुन्हे शाखेने पकडले.

पुणे न्यूज एक्सप्रेस :. पुणे :   जेजुरी  येथील माजी नगरसेवक  मेहबुब पानसरे यांच्या खून प्रकरणातील एकास गुन्हे शाखेने पकडले . युनिट सहाच्या पथकाने त्याला वाघोली परिसरातून सापळा रचुन त्याला पकडण्यात यश आले ,  दत्ता मारूती मळेकर (वय ४५, रा. 883, गुरूवार पेठ, महाराणा प्रताप रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस हवालदार मच्छिंद्र वाळके, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

उपनिबंधकांनी कर्नल विनायक केळकर आणि राजिब बासू वर घातली बंदीः

  उंड्रीतील न्याती सह. गृहनिर्माण सोसायटीतील प्रकरण.  पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे :  पुण्यातील मार्केट यार्ड येथील श्री दिगंबर हौसारे - उपनिबंधकांनी उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीमधील विनायक केळकर आणि राजीव बसू यांच्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत व तसे  अंमलबजावणी  साठीचे पत्र   सोसायटीच्या  चेअरमन  आणि सेक्रेटरीना पाठविण्यात  आले आहे.  उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे केळकर आणि  बासू  सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य असून, मुख्य कन्व्हेयन्स डीड प्रकरणांमध्ये लुडबूड करीत आहेत. कन्व्हेयन्स डीड प्रक्रियेमध्ये एफएसआय आणि टीडीआरचा वाटाघाटींचा समावेश असून,त्याचे मूल्य ५० कोटींनच्या पेक्षाही जास्त आहे. त्यातील मुख्य सूत्रधार केळकर न्याती बिल्डर्ससमवेत पूर्वी नोकरी केल्यामुळे जोडलेला आहे व आजही सोसायटीमधील सगळी माहिती तो बिल्डरला वेळोवेळी पुरवीत असतो व बिल्डरच्या  इशाऱ्याप्रमाणे  इथले कामकाज चालवीत असतो.विशेष म्हणजे केळकरच...