Skip to main content

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंदिरात स्क्रीन शटर नादुरुस्त असल्याने कार्यक्रम प्रदर्शिन होणे बंद....

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंदिरात स्क्रीन शटर नादुरुस्त असल्याने कार्यक्रम प्रदर्शिन होणे बंद.... 


डॉ.तुषार  निकाळजे. 

येरवडा, पुणे:- पुणे महानगरपालिकेचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  सांस्कृतिक रंगमंदिर, येरवडा, पुणे यामधील स्क्रीनशटर  नादुरुस्त झाल्याने सदर रंगमंचामुळे कलावंत, निर्माते, लघु चित्रपट वितरक यांची गैरसोय होत आहे. पुणे हे शैक्षणिक व सांस्कृतिक शहर असल्याने येथे वेगवेगळ्या कला, क्रीडा, नाटक, चित्रपट यांचे छोटे मोठे प्रयोग होत असतात. 

छोट्या व्यावसायिकांना सदरचे रंगमंदिर आर्थिक दृष्ट्या परवडत असते. परंतु सध्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंग मंदिरातील ( येरवडा) स्क्रीनशटर नादुरुस्त असल्याने तेथील स्क्रीन वर लघु चित्रपट, माहितीपट दाखविता येत नाहीत. तसेच अशासकीय संस्था, शासकीय कार्यालय यांचे माहिती वजा प्रोजेक्टर देखील तेथे दाखविता येत नाहीत. त्यामुळे गैरसोय होत आहे. कोविड १९ च्या अनुषंगाने सर्वच व्यवस्था कोलमडल्या होत्या. त्याला नाट्य, चित्रपट विभाग अपवाद नाही. या विभागात काम करणारे छोटे-मोठे कलावंत यांची  रोजी-  रोटी यावर अवलंबून असते. यापूर्वी पुण्यातील बिबेवाडी येथील  नाट्यगृहातून १८  लाख रुपये किमतीचे स्पीकर्स चोरीला गेल्याची घटना देखील नोव्हेंबर २०२१  मध्ये उघडकीस आली होती. साधारणत:  महिन्यापूर्वीच एका ज्येष्ठ  महाराष्ट्रातील  कलावंताने  खेद व्यक्त केला होता. शासनाच्या अखत्यारित असलेल्या नाट्यगृहांची अवस्था खालावली आहे, पंखे, जनरेटर, एअर कंडिशनर किंवा इतर तांत्रिक बाबी यांबाबत खंत व्यक्त केली होती.  महानगरपालिका याकडे लक्ष देईल का?

Comments