Skip to main content

प्रबोधिनी लोकमान्य व लोकशाहीरांना अभिवादन



पुणे न्यूज एक्सप्रेस : 

 इचलकरंजी ता.१ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या दोन्ही महामानवांच्या प्रतिमाना अन्वर पटेल आणि प्रा.रमेश लवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

पांडुरंग पिसे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले.यावेळी बोलताना समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी म्हणाले, 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच 'अशी सिंहगर्जना करून ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधी लढ्यामध्ये एका युगाचे नेतृत्व करणारे लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते होते.तर ही 'पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या व शेतकऱ्यांच्या घामावर तरलेली आहे 'असा सार्वकालीक सत्य विचार मांडून स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये सर्वार्थाने समता नांदावी, भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांची प्रस्थापना व्हावी यासाठी लेखणी व वाणी द्वारे आयुष्य समर्पित करणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे महान प्रज्ञावंत साहित्यिक होते. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह स्वातंतत्र्यासमोरच मोठे आव्हान निर्माण झाले आहे आणि संविधानाच्या मूल्यांची तोडमोड होत आहे.हे सारे थोपवायचे  असेल तर लोकमान्य व लोकशाहीर यांच्या विचारांची एकत्रित सांगड घालून आपणास पुढे जावे लागेल.यावेळी सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी ,अश्विनी कोळी, स्वाती दातार, हनुमंत काजवे, रवींद्र जिरगे, अल्लाबक्ष मुजावर, राजू पठाण ,किरण रणदिवे, आनंदा जिरगे, संपत जाधव आदी उपस्थित होते.

Comments