Skip to main content

किरीट सोमय्याच्या अश्लील कृत्या प्रकरणी शिवसेना महिला आघाडीचा निषेध



पुणे न्यूज एक्सप्रेस :

पुणे :- भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अश्लील कृत्याचा निषेध शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या पुणे महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला. यावेळी सोमय्याच्या पोस्टरच्या तोंडाला शेण लावून महिलांनी जोड्याने मारले तसेच पोस्टर पायाखाली तुडवून निषेध व्यक्त करण्यात आला. "असली विकृत घाण महाराष्ट्रातून बाहेर काढा", अशी मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी केली. 

यावेळी बोलताना शहर संघटीका सविताताई मते म्हणाल्या की, त्या व्हिडिओ संदर्भात भाजपा किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करावी तसेच गृहमंत्री या प्रकरणाची चौकशी करून काय कारवाई करणार आहेत ते स्पष्ट करावे. 

नगरसेविका पल्लवीताई जावळे म्हणाल्या, भाजप महिला नेत्या चित्रा वाघ आता का शांत बसल्या आहेत?, या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट होते की किरीट हा विक्षिप्त माणूस आहे त्यावर कारवाई व्हावी .

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्यावतीने आंदोलनास शहर संघटीका सविता मते, माजी नगरसेविका व संघटीका पल्लवी जावळे, विद्या होडे,करूणा घाडगे, प्रज्ञा लोणकर, स्नेहल पाटोळे, गौरी चव्हाण,पद्मा सोरटे, रोहिणी कोल्हाल, भारती भोपळे, दिपाली राऊत, संगीता भिलारे, मीनाक्षी हरिशंद्रे, नमिता चव्हाण, अमृत पठारे, सुलभा तळेकर, स्वाती ठकार, शितल जाधव, अनुपमा मांगडे ,विजया मोहिते, शिल्पा पवार ,वत्सला घुले ,अनिता जांभूळकर ,स्नेहल आल्हट, वासंती शिरसाट, आशुताई शिरसाट, भारती दामजी, पल्लवी नागपुरे, वैशाली दिघे, विमल परदेसी, लता गुंजाळ, प्रियांका जव्हेरी, स्मिता पवार, दिपा भंडारी, नीलू गड्डम, बेबी म्हेत्रे इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या .


अनंत रामचंद्र घरत 

प्रसिद्धी प्रमुख शिवसेना पुणे .

Comments

Popular Posts

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पहाणी

  चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पहाणी उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने करण्याच्या  सूचना पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे  : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामास भेट देऊन  पाहणी केली.  उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने पूर्ण करावे आणि उद्घाटन कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दीपक पोटे, अमोल बालवडकर, माजी नगरसेविका अल्पना वर्पे, आदी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुला प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १२ ऑगस्ट रोजी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्यादृष्टीने श्री. पाटील यांनी चांदणी चौक येथे भेट दिली. पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्...

उपनिबंधकांनी कर्नल विनायक केळकर आणि राजिब बासू वर घातली बंदीः

  उंड्रीतील न्याती सह. गृहनिर्माण सोसायटीतील प्रकरण.  पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे :  पुण्यातील मार्केट यार्ड येथील श्री दिगंबर हौसारे - उपनिबंधकांनी उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीमधील विनायक केळकर आणि राजीव बसू यांच्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत व तसे  अंमलबजावणी  साठीचे पत्र   सोसायटीच्या  चेअरमन  आणि सेक्रेटरीना पाठविण्यात  आले आहे.  उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे केळकर आणि  बासू  सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य असून, मुख्य कन्व्हेयन्स डीड प्रकरणांमध्ये लुडबूड करीत आहेत. कन्व्हेयन्स डीड प्रक्रियेमध्ये एफएसआय आणि टीडीआरचा वाटाघाटींचा समावेश असून,त्याचे मूल्य ५० कोटींनच्या पेक्षाही जास्त आहे. त्यातील मुख्य सूत्रधार केळकर न्याती बिल्डर्ससमवेत पूर्वी नोकरी केल्यामुळे जोडलेला आहे व आजही सोसायटीमधील सगळी माहिती तो बिल्डरला वेळोवेळी पुरवीत असतो व बिल्डरच्या  इशाऱ्याप्रमाणे  इथले कामकाज चालवीत असतो.विशेष म्हणजे केळकरच...