Skip to main content

चांद्रयान मोहिमेचे यश अतुलनीय :डॉ पी ए इनामदार



पुणे न्यूज एक्सप्रेस : 

पुणे : चांद्रयान मोहिमेचे भारताचे यश अतुलनीय असून प्रगत देशांच्या श्रेणीत भारत जाऊन बसला आहे.भारताचे शास्त्रज्ञ,इस्त्रो  सारख्या संस्था आणि पं.नेहरूंपासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्व पंतप्रधान यांना हे श्रेय जाते.एक भारतीय म्हणून सर्वांना हा अभिमानाचा क्षण आहे.अनेक दशकांची मेहनत,संशोधन फळास आले आहे.

विज्ञान आणि संशोधनाला या यशामुळे प्रेरणा मिळेल.शैक्षणिक संस्थांनी वैज्ञानिक दृष्टिकोन,विज्ञान-तंत्रज्ञान-संशोधनाला प्राधान्य देणे सर्वांगीण प्रगतीसाठी हितकारक ठरेल',अशी प्रतिक्रिया 'डॉ पी ए इनामदार युनिव्हर्सिटी चे कुलपती डॉ पी ए इनामदार यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

दरम्यान,चांद्रयानाच्या मोहिमेचे थेट प्रक्षेपण आझम कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. 







Comments

Popular Posts

शांताराम बापूंना बाराव्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

  शांताराम बापूंना बाराव्या  स्मृतीदिनी विनम्र अभिवादन पुणे न्यूज एक्सप्रेस :  प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा आज रविवार ता. ३ सप्टेंबर २०२३ रोजी बारावा  स्मृतिदिन आहे. त्यांना कालवश होऊन एक तप झाले.१५ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले शांताराम बापू वृद्धापकाळाने शनिवार ता.३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात,विचारविश्वात ते तब्बल सात दशके कार्यरत होते. कमालीची साधी राहणी, वक्तशीरपणा, विचारातील स्पष्टता आणि बोलण्यातील मार्मिकता इत्यादी अंगभूत वैशिष्ट्यांसह बापू अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांनी थोर  विचारवंत नेते कालवश प्रा.डॉ.एन.डी.पाटील,शहीद गोविंद पानसरे यांच्यासह आपल्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद असलेल्या ‘ समाजवादी प्रबोधिनी ‘ची ११ मे १९७७ रोजी स्थापना केली. वयाच्या आठव्या वर्षीच स्वातंत्र्य आंदोलनातील वातावरणाने आणि व...

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पहाणी

  चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पहाणी उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने करण्याच्या  सूचना पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे  : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामास भेट देऊन  पाहणी केली.  उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने पूर्ण करावे आणि उद्घाटन कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दीपक पोटे, अमोल बालवडकर, माजी नगरसेविका अल्पना वर्पे, आदी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुला प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १२ ऑगस्ट रोजी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्यादृष्टीने श्री. पाटील यांनी चांदणी चौक येथे भेट दिली. पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्...