Skip to main content

Posts

समन्स ची प्रत देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलिसावर कारवाई

  लाच प्रकरणी अटक महिला पोलीस कॉन्स्टेबल काजल लोंढे पुणे न्यूज एक्सप्रेस :  मुरलीधर कांबळे :    कोल्हापूर- तक्रार अर्जाची निकाली काढ़लेल्या समन्स ची प्रत देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महिला कॉन्स्टेबल काजल गणेश लोंढ़े  ब.न.217  (वय 28 रा.बंगला नं.10 ,तिसरा मजला पार्वती कंन्सट्रकशन,सरनोबतवाडी ) असे लाच घेणाऱ्या महिलेचे नाव आहे. या पोलिस मुख्यालयात महिला सहाय्य कक्षात गेल्या आठ महिन्यांपासून कार्यरत आहेत त्याची 2014 ला जॉईनिंग आहे.अधिक माहिती अशी की,तक्रारदार यांनी  घरगुती कारणातुन पत्नीच्या विरोधात महिला सहाय्य कक्षाकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता तो अर्ज निकाली काढ़ण्यात आला .त्या निकाली काढ़लेल्या अर्जाची समन्सची प्रतची मागणी केली असता महिला कॉ.काजल लोंढ़े यांनी प्रत देणेसाठी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली असता तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलूचपत विभागाने पडताळणी करून सापळा रचून सदर काजल लोंढ़ेला दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून कारवाई केली. या कामी लाचलुचपत सांगली पोलिसांची ...

बेडकीहाळ येथे तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मान्यवरांची उपस्थिती

  बेडकीहाळ येथे तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मान्यवरांची उपस्थिती पुणे न्यूज एक्सप्रेस : बेडकीहाळ :-दूधगंगा नदीच्या काठावर वसलेले बेडकीहाळ हे गाव आर्थिकदृष्ट्या सधन म्हणून ओळखले जाते. दूधगंगा नदीचे बारमाही वाहणारे पाणी, सुपीक जमीन आणि उसासारख्या नगदी पिकाने हा परिसर सधन समजला जातो. तसेच सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि विशेष करून शैक्षणिक क्षेत्रात बेडकीहाळ अग्रेसर मानले जाते. बेडकीहाळ गावचे भौगोलिक स्थान पाहता बेळगाव, निपाणी, चिकोडी, कोल्हापूर, सांगली, हुपरी, इचलकरंजी अशा कर्नाटक महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना जोडणारे रस्ते आणि वाहतुकीची सोय यामुळे या परिसराचा झपाट्याने कायापालट होताना दिसतो आहे. या परिसरातील पहिले हायस्कूल 1952 साली बेडकीहाळ येथे स्थापन झाले आणि शैक्षणिक वटवृक्षाचे बीजारोपण झाले. हीच संस्था पुढे लठ्ठे शिक्षण संस्था या नावाने ओळखली जाऊ लागली आणि दळणवळणाच्या सोयीसाठी तिचे केंद्रीय कार्यालय सांगली येथे स्थापन करण्यात आले.  आज लठ्ठे शिक्षण संस्थेच्या शाखा बेडकीहाळ येथे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. लठ्ठे शिक्षण संस्थेमुळे बेडकीहाळचे नाव शैक्षणिक क्षेत्रात आदराने...

मेहबुब पानसरे यांच्या खून प्रकरणातील एकास गुन्हे शाखेने पकडले.

पुणे न्यूज एक्सप्रेस :. पुणे :   जेजुरी  येथील माजी नगरसेवक  मेहबुब पानसरे यांच्या खून प्रकरणातील एकास गुन्हे शाखेने पकडले . युनिट सहाच्या पथकाने त्याला वाघोली परिसरातून सापळा रचुन त्याला पकडण्यात यश आले ,  दत्ता मारूती मळेकर (वय ४५, रा. 883, गुरूवार पेठ, महाराणा प्रताप रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस हवालदार मच्छिंद्र वाळके, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

टोमॅटो दरवाढीच्या अनुषंगाने उपाययोजनांचा कृषि आयुक्तांनी घेतला आढावा

उपलब्धतेबाबत अहवाल सादर करण्याचे अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांना दिले निर्देश पुणे न्यूज एक्सप्रेस : पुणे  : सध्या बाजारात वाढलेले टोमॅटोचे दर व त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. चालू खरीप हंगामातील टोमॅटो पिकाखालील क्षेत्र व उत्पादनाबाबत माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी यावेळी दिले. राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण ५६ ते ५७ हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४० ते ४२ हजार हेक्टर क्षेत्र तर रब्बी व उन्हाळी हंगामात सर्वसाधारण १६ ते १७ हजार हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली जाते. यापासून सर्वसाधारणपणे १० लाख मे. टन उत्पादन अपेक्षित असते. डिसेंबर २०२२ ते मे २०२३ दरम्यान टोमॅटोला अतिशय अल्प दर मिळाल्याने या पिकाच्या नवीन लागवडीवर त्याचा परिणाम झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तसेच मार्च पासून मे महिन्यापर्यंत अवेळी पाऊस, गारपीट यामुळे टोमॅटो आणि इतर भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसून येते. यावर्षी पाऊस उशिरा आला असून सरासरीच्या ५...

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा अट रद्द करा

  या मागणी करिता पॅंथर आर्मीचे आझाद मैदान मुंबई येथे 20 जुलै रोजी आंदोलन पुणे न्यूज एक्सप्रेस :  मुंबई प्रतिनिधी : अनुसूचित जाती व नव बौद्ध भूमीहीन शेतमजुरांना सबल करणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा बागायती करिता आठ लाख रुपये व जिरायती करिता पाच लाख रुपये ही अट रद्द करून बाजारभावानुसार शेतजमिनी खरेदी करून द्याव्यात या मागणी करिता पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने मुंबई आझाद मैदान येथे 20  जुलै रोजी आंदोलन करणार असल्याचे निवेदन राष्ट्रीय कार्यकारी प्रमुख संतोष आठवले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांना दिले आहे. महाराष्ट्र राज्यातील भूमीहिंना च्या सबलीकरणाचा एक भाग म्हणून राज्य शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना सुरू केली पण यंत्रणेतील असंवेदनशीलतेमुळे व जाचक अटी मुळे भूमिहीन शेतमजूर शेतमालक बनणारी योजना म्हणावी इतकी प्रभावी ठरू शकली नाही .सामाजिक न्याय विभागाला प्रत्येक वर्षी हजारो कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करून सुद्धा भूमीहिंनाच्या योजनेसाठी शूल्लक तरतूद...

जैनमुनींच्या हत्ये प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा दया :- विहिप बजरंग दल व वीर सेवा दल इचलकरंजीच्या वतीने निषेध व प्रांताधिकरीना निवेदन..

  जैनमुनींच्या हत्ये प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा दया :- विहिप बजरंग दल व वीर सेवा दल इचलकरंजीच्या वतीने निषेध व प्रांताधिकरीना निवेदन.. पुणे न्यूज एक्सप्रेस :     इचलकरंजी :   हिंदू समाजाचा गाभा शक्ती स्थान असलेल्या साधू संत यांच्या वरील हल्ले म्हणजे समस्त हिंदू समाजावर हा घात आहे भविष्यात अश्या घटना घडू नये म्हणून तीव्र निषेध करत प्रांताधिकारी यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दल व वीर सेवा दल इचलकरंजी च्या वतीने निवेदन देण्यात आले.. अखंड हिंदुस्थान हा जगातील एकमेव देश आहे जो सहिष्णू सर्वसमावेक्षक व लोकशाही वर चालणारे राष्ट्र आहे याचे एकमेव कारण म्हणजे या भूमिस लाभलेली थोर संत महात्माची पार्श्वभूमी परंतु गेल्या काही दिवसांपासून अखंड हिंदुस्थान भर धर्मांध लोकांपासून आघात केले जात आहेत मग ते परधर्मीय असो किंवा स्वधर्मीय धर्माध हे अत्यंत निंदनीय व निषेधार्ध बाब आहे. जगाला अहिंसा व एकोपाचा संदेश देणारे चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी १०८ कामकुमार नंदी महाराज यांची निर्घून हत्या करण्यात आली जी हिंदू समाजावर मोठया प्रमाणात आघात करणारी बा...

शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतूकीत बदल

 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतूकीत बदल पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे. :  पुरंदर तालुक्यातील जेजुरी  येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत. वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून १३ जुलै रोजी पहाटे ५  वाजेपासून ते सायं. ८ वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.  जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक: सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड अवजड व इतर - वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्...