Skip to main content

Posts

प्रबोधिनी लोकमान्य व लोकशाहीरांना अभिवादन

पुणे न्यूज एक्सप्रेस :   इचलकरंजी ता.१ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या दोन्ही महामानवांच्या प्रतिमाना अन्वर पटेल आणि प्रा.रमेश लवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.  पांडुरंग पिसे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले.यावेळी बोलताना समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी म्हणाले, 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच 'अशी सिंहगर्जना करून ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधी लढ्यामध्ये एका युगाचे नेतृत्व करणारे लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते होते.तर ही 'पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या व शेतकऱ्यांच्या घामावर तरलेली आहे 'असा सार्वकालीक सत्य विचार मांडून स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये सर्वार्थाने समता नांदावी, भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांची प्रस्थापना व्हावी यासाठी लेखणी व वाणी द्वारे आयुष्य समर्पित करणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे महान प्रज्ञावंत साहित्यिक होते. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह स्वातंतत्र्यासमोरच मोठे आव्हा...

किरीट सोमय्याच्या अश्लील कृत्या प्रकरणी शिवसेना महिला आघाडीचा निषेध

पुणे न्यूज एक्सप्रेस : पुणे :- भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अश्लील कृत्याचा निषेध शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या पुणे महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला. यावेळी सोमय्याच्या पोस्टरच्या तोंडाला शेण लावून महिलांनी जोड्याने मारले तसेच पोस्टर पायाखाली तुडवून निषेध व्यक्त करण्यात आला. "असली विकृत घाण महाराष्ट्रातून बाहेर काढा", अशी मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी केली.  यावेळी बोलताना शहर संघटीका सविताताई मते म्हणाल्या की, त्या व्हिडिओ संदर्भात भाजपा किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करावी तसेच गृहमंत्री या प्रकरणाची चौकशी करून काय कारवाई करणार आहेत ते स्पष्ट करावे.  नगरसेविका पल्लवीताई जावळे म्हणाल्या, भाजप महिला नेत्या चित्रा वाघ आता का शांत बसल्या आहेत?, या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट होते की किरीट हा विक्षिप्त माणूस आहे त्यावर कारवाई व्हावी . यावेळी शिवसेना महिला आघाडीच्यावतीने आंदोलनास शहर संघटीका सविता मते, माजी नगरसेविका व संघटीका पल्लवी जावळे, विद्या होडे,करूणा घाडगे, प्रज्ञा लोणकर, स्नेहल पाटोळे, गौरी चव्हाण,पद्मा सोरटे, रोहिणी कोल्हाल, भारती भोप...

तळागळातील लोकांसाठी निस्वार्थपणे झटणारे आलताफभाई आहेत - जय पाटील

तळागळातील लोकांसाठी निस्वार्थपणे झटणारे आलताफभाई आहेत - जय पाटील पुणे न्यूज एक्सप्रेस : बारामती: मुस्लीम समाजातील तळागळातील लोकांसाठी निस्वार्थपणे झटणारे आलताफभाई सय्यद असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती शहर अध्यक्ष जय पाटील यांनी व्यक्त केले.मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे उन्नती मुदत कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या वतीने आलताफ सय्यद यांचा आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी श्री.पाटील बोलत होते.  यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर युवकाध्यक्ष अविनाश बांदल, मुस्लिम समाजातील ज्येष्ठ हाजी शब्बीर कुरेशी, मा.उपनगराध्यक्षा सौ.तरन्नुम सय्यद, मा.नगरसेवक सुरज सातव, कुंदन लालबिगे, संतोष जगताप, कसबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जमीर इनामदार, हाजी युसूफ इनामदार, सादिक मोमीन, निसार शेख, जाकीर तांबोळी, हाजी रशिद बागवान, कारी साहब, मुक्ती सरवत, तैनुर शेख इ. मान्यवर उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले की, समाजसेवा म्हणजे दबलेल्या, पिचलेल्यांना हात देणे त्यांना उभे करणे हे काम आलताफभाईंनी केले व करीत आहेत. रईस चित्रपटाचे उदाहरण देत ते म्हणाले, शाहरूख खान आपल्या जवळच्या लोकांची व...

अवधुत आखाडा व्यायाम मंडळ "चे नूतनीकरण नंतर अत्याधुनिक नवीन पध्दतीने सुसज्ज असलेल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन सोहळा संपन्न

पुणे न्यूज एक्सप्रेस :  मुसा खलिफा :  इचलकरंजी :  वस्ञपंढरीतील नामांकित म्हणून प्रसिद्ध असलेल्या अवधुत आखाडा परिसरातील "शतक महोत्सवी अवधुत आखाडा व्यायाम मंडळ "चे नूतनीकरण नंतर अत्याधुनिक नवीन पध्दतीने सुसज्ज असलेल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन आज सोमवार दिनांक 17 जुलै,23 रोजी सायंकाळी  व्यायाम मंडळाच्या प्रांगणात शिवसेनेचे (शिंदे गट) चे लोकप्रिय व अतुलनीय विकासाभिमुख कार्यसम्राट जिल्हाध्यक्ष श्री रविंद्र जी माने साहेब, महाराष्ट्र केसरी श्री अमृतमामा भोसले साहेब, माजी नगरसेवक श्री भाऊसो आवळे साहेब  यांच्या अमृत हस्ते फीत कापून शानदार उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इचलकरंजीत ज्येष्ठ व श्रेष्ठ पितृतूल्य उत्तुंग व्यक्तीमत्व असलेले वंदनीय श्रीमान रेहमान चाचा खलिफा होते.  या सोहळ्यास मंडळाचे क्रियाशील अध्यक्ष श्री रमेश जी दादा शिरगुरे साहेब, उपाध्यक्ष श्री रविंद्र जी माने साहेब, विद्यमान व सर्वानाच सोबत घेऊन कार्यरत राहणारे नम्रशील सेक्रेटरी श्री आझम जी तथा मुसाभाई खलिफा साहेब, कार्यतत्पर खजिनदार श्री गजानन रावजी शिरगुरे साहेब, कर्तव्यदक्ष सर्वश्री ...

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पुणे न्यूज एक्सप्रेस  पुणे : शिवसेना पुणे शहराचे निष्ठावान , आक्रमक शहरप्रमुख संजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवसेना संपर्कप्रमुख पुणे जिल्हा आ सचिनजी अहिर , पश्चिम महाराष्ट्र संपर्क समन्वयक रवींद्रजी मिर्लेकर यांनी शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पुणे शहराच्या वतीने नाना पेठ येतील पीजीआय हॉल येथे आखाड भोजनाचा कार्यक्रम झाला . यावेळी संजय मोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्र पक्षाचे आमदार रवींद्र धांगेकर , आ मोहन जोशी , मा मंत्री रमेश बागवे , मा नगरसेवक रवींद्र माळवदकर , अविनाश बागवे, सुशीला नेटके, मनीष साळुंके , मा पी एम टि सदस्य बाळासाहेब आमरले, मोहम्मद चिस्ती ,  तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, मा आमदार महादेव बाबर, मा गटनेते पृथ्वीराज सुतार , अशोक हरणावळ, मा नगरसेवक बाळासाहेब ओसवाल , प्रशांत बधे, पल्लविताई जावळे , विशाल धनवडे, तानाजी लोणकर , योगेश मोकाटे, युवासेनेचे सहसचिव मोहसीन शेख, रेणुका साबळे,  शिवसेना पदाधिकारी , महिला , युवासेना, युवती सेना पदाधिकारी असंख्य शिवसैनिक इतर पक्षातील पदाधिकारी , पत्रकार मित्र, सामाजिक कार्यकर्ते  उपस...

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पहाणी

  चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पहाणी उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने करण्याच्या  सूचना पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे  : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामास भेट देऊन  पाहणी केली.  उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने पूर्ण करावे आणि उद्घाटन कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दीपक पोटे, अमोल बालवडकर, माजी नगरसेविका अल्पना वर्पे, आदी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुला प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १२ ऑगस्ट रोजी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्यादृष्टीने श्री. पाटील यांनी चांदणी चौक येथे भेट दिली. पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्...

प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन

  प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक शेवट पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे जिल्ह्य़ातील मावळ येथील एका सोसायटीतील एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळला.   निधन समयी त्यांचे वय ७७ होते . 80 च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीतील हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रविंद्र महाजनी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले.  या एव्हरग्रीन अभिनेत्याच्या करिअरची सुरुवात टॅक्सी चालवण्यापासून झाली होती.  रविंद्र महाजनी हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. अभिनय क्षेत्रात पाय ठेवण्यापूर्वी ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत. त्यांनी साधारणपणे 3 वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली. मात्र, त्यांच्यातील एक कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ते दिवसा वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत. रविंद्र महाजनी यांनी मराठीसह हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्येही काम केले. रविंद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात...